दोन महिन्यांत अवघी दहा टक्के घरपट्टी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:12 AM2021-06-02T04:12:37+5:302021-06-02T04:12:37+5:30

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थचक्रावर परीणाम कायम असून, पाणीपट्टी पाठोपाठ घरपट्टीलाही मोठा फटका बसला आहे. दरवर्षी नवीन आर्थिक वर्षात ...

In just two months, ten percent of the property was recovered | दोन महिन्यांत अवघी दहा टक्के घरपट्टी वसूल

दोन महिन्यांत अवघी दहा टक्के घरपट्टी वसूल

googlenewsNext

नाशिक : कोरोनामुळे महापालिकेच्या अर्थचक्रावर परीणाम कायम असून, पाणीपट्टी पाठोपाठ घरपट्टीलाही मोठा फटका बसला आहे. दरवर्षी नवीन आर्थिक वर्षात बिलांची वाट न बघता स्वेच्छेने घरपट्टी भरणाऱ्यांना पाच टक्के सवलत देण्यात येते. मात्र, सलग दोन महिने अशी सवलत देऊनदेखील १९० कोटी रुपयांच्या उद्दिष्टांपैकी केवळ १८ कोटी ३८ लाख रुपयांचीच वसुली झाली आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर आर्थिक वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात वसुलीला फटका बसला होता. महापालिकेच्या वतीने दर वर्षी एप्रिल महिन्यात पाच टक्के, मे महिन्यात तीन, तर जून महिन्यात दाेन टक्के सवलत दिली जाते. त्यातच ऑनलाईन घरपट्टी भरल्यास एक टक्का अधिक, तर सोलर वॉटर हिटर असल्याची आणखी पाच टक्के सवलत देण्यात येते. यंदा महापालिकेने एप्रिलपाठोपाठ मे महिन्यातही पाच टक्के सवलत दिली. परंतु, अपेक्षित वसुली झाली नाही. महापालिकेने यंदाच्या आर्थिक वर्षात घरपट्टी वसुलीचे एकूण १९० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात दोन महिन्यांत प्रत्यक्ष आणि ऑनलाईन पद्धतीने अवघे १८ कोटी ३८ लाख २६ हजार १४४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या दोन महिन्यांत एकूण ६७ हजार २३६ करदात्यांनी करसवलतीचा लाभ घेतला आहे. यामध्ये सिडको विभागातील सर्वाधिक १६,१६२ करदाते, त्यानंतर पूर्व नाशिक विभागातील १५,१५८, तसेच नाशिकरोड १३,५६०, नाशिक पश्चिम ८१८८ व सातपूर विभागातील ६३५७ करदात्यांनी लाभ घेतला आहे. एकूण वसुलीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत जेमतेम दहा टक्क्यांच्या आत वसुली झाल्याने महापालिका आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

इन्फो...

महापालिकेला सवलतीच्या दोन महिन्यांत अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, मात्र घरपट्टीच्या एकूण सवलतींच्या रकमेचा विचार केला तर प्रत्येकाच्या घरपट्टीत पाच टक्के या हिशेबाने एकूण ६४ लाख ८६ हजार ९८ रुपयांची सूट द्यावी लागली आहे.

इन्फो...

दोन महिन्यांत झालेली घरप‌ट्टी वसुली (कोटीत)

विभाग घरपट्टी वसुली

नाशिक पूर्व २.८१

नाशिक पश्चिम ५.२५

सिडको २.२८

सातपूर ३.०९

पंचवटी २.३७

नाशिकरोड २.५६

एकूण १८.३८

Web Title: In just two months, ten percent of the property was recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.