व्हॅलेंटाईन दिनाच्या आधीच युवकाने झाडली स्वत:वर गोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:14 AM2021-02-14T04:14:23+5:302021-02-14T04:14:23+5:30
प्रेमाची व्याख्या जो तो वेगवेगळ्याप्रकारे करतो; मात्र प्रेमापोटी आपले उभे आयुष्य धोक्यात घालणे हे शहाणपणाचे अजिबातच नाही. उभ्या आयुष्याचा ...
प्रेमाची व्याख्या जो तो वेगवेगळ्याप्रकारे करतो; मात्र प्रेमापोटी आपले उभे आयुष्य धोक्यात घालणे हे शहाणपणाचे अजिबातच नाही. उभ्या आयुष्याचा कुठलाही विचार न करता प्रेमभंगासारख्या कारणातून स्वत:चे जीवन संपविणे हे अत्यंत दुर्दैवी असेच आहे. सातपूर कॉलनीमध्ये राहणारा रोहित राजेंद्र नागरे (२८,रा. शिवनेरी चौक) हा शनिवारी रात्री बारा वाजता अचानकपणे पल्सर दुचाकीने (एमएच १५-एफजे ४६८७) घराबाहेर पडला. सातपूर औद्योगिक वसाहत आणि भवर मळ्यामधून जाणाऱ्या नाल्यालगत एका कच्च्या रस्त्यावर झाडाखाली रोहितचा मृतदेह शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आढळून आला. घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून देशी बनावटीचे पिस्तूल व रोहितची दुचाकी पोलिसांनी जाप्त केली. पिस्तूलमध्ये केवळ एकच रोहितने स्वत:वर झाडलेली गोळी होती, असे पोलिसांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविला. प्रेमप्रकरणातून आत्महत्या? केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेची वार्ता सातपूर, गंगापूरसह परिसरात वाऱ्यासारखी पसरली. प्रारंभी युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली का? असा संशयही व्यक्त झाला. त्यामुळे हत्या की आत्महत्या? अशी चर्चा सुरू झाली; मात्र पोलिसांनी याप्रकरणी तपास करत रोहितने स्वत: छातीवर एक गोळी झाडून आत्महत्या? केल्याचे निष्पन्न केले.
--इन्फो---
रोहितचे कोणाशीही वाद नाही अन् पोलिसात नोंदही नाही
रोहित विरोधात पोलीस दप्तरी यापूर्वी काहीही नोंद आढळून आलेली नाही. त्याचे कोणाशीही वाद नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांनी शेवटचे फोन कॉल्स व इतर माहिती घेण्यासाठी रोहितचा मोबाईल ताब्यात घेतला असून मोबाईल मधील व्हॉटसअँप स्टेट्स तपासले असता सर्व स्टेट्स प्रेमभंग अथवा प्रेमप्रकरणाशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. यामुळे रोहितने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज सातपुर पोलिसांनी व्यक्त केला आहे. सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
---
फोटो आर वर १३रोहित नावाने सेव्ह
===Photopath===
130221\13nsk_8_13022021_13.jpg
===Caption===
रोहित नागरे