न्या. रानडे व्याख्यानमालेस प्रारंभ
By Admin | Published: January 19, 2017 12:45 AM2017-01-19T00:45:27+5:302017-01-19T00:45:54+5:30
न्या. रानडे व्याख्यानमालेस प्रारंभ
निफाड : निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने न्या. रानडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त समाजप्रबोधन व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी समता ज्योतीचे प्रज्वलन करून केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रल्हाद पाटील कराड, अप्पासाहेब उगावकार, वि. दा. व्यवहारे, तात्यासाहेब वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, मधुकर राऊत, तारा पाटील, श्रीमती गांगल आदि उपस्थित होते. प्रास्तविक वि. दा. व्यवहारे यांनी केले. न्या. रानडे यांच्या अंगी प्रखर बुद्धिमत्ता होती. ते अखंड ज्ञानाचा झरा होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, असे प्रतिपादन स्वानंद बेदरकर यांनी केले. याप्रसंगी वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ या गीतावर आधारित समूहनृत्य सादर केले.
याप्रसंगी प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य मालती वाघावकर, पर्यवेक्षक रेखा चौधरी, प्राचार्य देवेंद्र सांबरे, पल्लवी सानप, योगेश्वर सी. एस. वाघ, अलका जाधव, प्रसन्ना कुलकर्णी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी केले. रतन पाटील वडघुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)