देहभान विसरून ज्येष्ठांनी अनुभवले ‘रम्य ते बालपण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 05:58 PM2018-08-19T17:58:51+5:302018-08-19T18:00:00+5:30
सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली आयुष्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात.
सिन्नर : आयुष्यभर सांभाळलेली आयुष्याची जबाबदारी पुढच्या पिढीवर सोपवून उर्वरित आयुष्य समवयस्कांसोबत हसत-खेळत जावे यासाठी येथील ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. ज्येष्ठ नागरिकांना सतत आनंदी ठेवण्यासाठी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक मु. शं. गोळेसर यांनी यावर्षी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी तळ्यातील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांची सहल, वनभोजन आदींसह आनंद मेळा घेण्यात आला होता.
नागपंचमीपासून ढग्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भैरवनाथ मंदिरात हभप त्र्यंबक बाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. याचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आनंद मेळावा आयोजित केला जातो. दुपारी १२ वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक आपल्या परिवारासह शिदोऱ्या घेऊन मंदिराच्या प्रांगणात जमा झाले. त्र्यंबकबाबा भगत यांच्या ‘सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला’ या भजनाने व ज्येष्ठ नागरिकांच्या सामुदायिक हरिपाठाने मंगलमय वातावरणात आनंदमेळ्याचा शुभारंभ झाला. मेळाव्यात लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीतर्फे नागरिकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी हेमंत वाजे, लायन्स क्लबच्या अध्यक्ष राजश्री कपोते, सुरेश कट्यारे, जितेंद्र जगताप, डॉ. विजय लोहारकर, वसंत कासट, चंद्रकांत जाधव, महावीर परदेशी, भाऊशेठ जाधव, रघुनाथ गुजर, बाळकृष्ण शिंदे, जानकीराम कर्पे, कृष्णाजी रंधे, पुरुषोत्तम बोरसे, निवृत्ती बोडके, श्रीराम क्षत्रिय, शशिकांत देवळालकर, साहेबराव देशमुख, भानुदास माळी, हिरालाल कोकाटे, रघुनाथ सोनार, अर्जुन गोजरे, विठ्ठल केदार, लहानू गुंजाळ, एकनाथ चव्हाण, विलास कर्पे, अशोक मूत्रक, रामनाथ चव्हाण, स्मिता थोरात, सुजाता लोहारकर, शिल्पा गुजराथी, श्यामल माळवे, जयश्री जगताप, तेजस्विनी वाजे, मेधा पाळसे आदींनी सहभाग घेतला होता.