के. के. वाघ वरिष्ठ महाविद्यालय चांदोरी येथे आॅनलाइन शिक्षक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 04:55 PM2020-09-05T16:55:33+5:302020-09-05T16:57:35+5:30
चांदोरी : के. के. वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचा कार्यक्र म झूम अॅपद्वारे आॅनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी शिक्षकाची भूमिका जबाबदारीची व महत्वाची असल्याचे सांगितले पुढे ते म्हणाले शिक्षकांनी नवनिर्मिती करणारे विद्यार्थी घडविले पाहिजे विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणारा, प्रेरणा देणारा शिक्षक हा आदर्शवत असतो. म्हणून शिक्षकाला महत्व आहे. यासाठी शिक्षक चरित्रवान, शीलवान असला पाहिजे. असे शिक्षक विद्यार्थ्यांचे लाडके बनतात. त्यादृष्टीने शिक्षकांनी कार्य केले पाहिजे असे डॉ. दातीर यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
या वेळी कला विभाग प्रमुख डॉ. हनुमंत वाघमारे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रवीण आहेर यांनी शिक्षकाविषयी आपले अनुभव कथन केले. कार्यक्र माचे संयोजन विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. डी. एन. दुर्गेष्ट, प्रा. नितीन जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापिका गुंडगळ यांनी केले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी प्रा. बी. बी कोल्हे, कोकाटे यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्र मास महाविद्यालयातील ८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. पहिल्या सत्रात विद्यार्थी शिक्षक बनून विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले. त्यातून उत्कृष्ट अध्यापन करणाऱ्या विजेत्या विद्यार्थी शिक्षकांचे अभिनंदन केले. (०५ चांदोरी)