के. आर. टी. हायस्कूल वणी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 07:17 PM2018-12-12T19:17:27+5:302018-12-12T19:17:47+5:30
वणी : के. आर. टी. हायस्कूल वणी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक तथा दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते झाले.

कृषी आणि जैविक शेती आरोग्य आणि स्वच्छता संशाधन व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन वाहतूक दळणवळण गणितीय प्रतिकृती या विषयावर सदर विज्ञान प्रदर्शन होते. या प्रदर्शनात प्राथमिक गटातील ४० तर माध्यमिक गटात ५१ प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच ९ विज्ञान रांगोळी काढण्यात आल्या.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य आबासाहेब देशमुख, किसन मोरे, मुख्याध्यापक डी. बी. चंदन, उपमुख्याध्यापक सौ. के. जी. बैरागी, पर्यवेक्षक एस. व्ही. खुर्दळ, पर्यवेक्षक बी. जे. बच्छाव यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. विज्ञान प्रदर्शन यशस्वीतेसाठी माजी सेवक संचालक बी. आर. पाटील, एस. डी. मोरे, के. एस. गोसावी, आर. ए. भरसट, आर. ए. साठे, आर. बी. कोल्हे, श्रीमती इंगळे, जावळे, बागले, साबळे, गवळी, आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्र माचे सुत्रसंचालन वाय. यू. बैरागी यांनी तर आभार आर. बी. कोल्हे यांनी मानले. (फोटो १२ वणी)