निफाड येथील न्यायालय परिसरात बहरला कदंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 01:01 AM2019-08-18T01:01:16+5:302019-08-18T01:08:40+5:30
लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्षाने बहुरंगी टोकदार फुलांंची जणूकाही दुलई पांघरल्याचा भास पाहणाऱ्यांना होतो.
शेखर देसाई।
लोकमत न्यूज नेटवर्क
लासलगाव : निफाड येथील न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या कदंब वृक्षावर डेरेदार कदंब फुले बहरली असून, पाढऱ्या रंगाची चेंडूसारखी गोलाकार दिसणारी ही आकर्षक फुले पाहणारांच्या डोळ्याचे पारणे फेडत आहेत. मोठ्या प्रमाणात बहरलेल्या या फुलांमुळे कदंब वृक्षाने बहुरंगी टोकदार फुलांंची जणूकाही दुलई पांघरल्याचा भास पाहणाऱ्यांना होतो.
भाद्रपदच्या अखेरपर्यंत या फुलांचा बहर असतो. त्यानंतर फुलांचे फळामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते. फुलांचा सुगंध परिसरात दरवळत असल्याने वातावरण चैतन्यदायी बनले आहे. आयुर्वेदात या फुलांचे गुण सांगितले आहे. पुराणातही या वृक्षाची महती दिसून येते. निफाड येथील न्यायालयाबाहेरील या बहुरंगी वृक्षांमुळे वेगळीच झळाली प्राप्त झाली आहे. काही कालावधीतच त्यांचे फळांमध्ये रूपांतर होते.
फळांचा गुच्छही आकर्षक असतो असे जाणकारांनी सांगितले. आकर्षक बहुगुणी कदंब
कदंब वृक्ष भारतात विविध राज्यांमधील जंगलात आढळतो. महाराष्ट्रात कोकण व मावळ भागात हा वृक्ष बहरलेला दिसतो. साधारण १० ते २५ मीटर उंचीपर्यंत कदंब वाढतो. पावसाळ्यात कदंबचा फुलोरा लक्षवेधी ठरतो. पावसाळ्यात अन्य प्रजातीचा फुलोरा नाहीसा झालेला असतो, तेव्हा मधमाशांसारख्या किटकांना कदंबपुष्पांचा आधार असतो. जुले-आॅगस्टमध्ये या झाडाला फुले येतात. शहरासह जिल्ह्यात कदंब वृक्ष चांगल्या संख्येने पहावयास मिळतात. हा वृक्ष दीर्घायुषी प्रकारात मोडतो. फुलांप्रमाणे पानेदेखील तितकेच आकर्षक करणारे असतात. पश्चिम बंगाल राज्यात तर भाद्रपद महिन्याच्या एकादशीला शेतकºयांमध्ये ‘कदंब उत्सव’ साजरा करण्याची प्रथा आहे. कदंब वृक्ष पोटाच्या तक्र ारींवर तसेच सर्दी-खोकल्यावर गुणकारी ठरतो. कदंबाच्या फळांचा रस तसेच खोडाच्या सालीचा काढा औषध म्हणून घेतला जातो. आयुर्वेदात या वृक्षाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कदंब हा शततारका नक्षत्राचा आराध्य वृक्ष मानला जातो.निफाड येथील न्यायालयात दररोज हजारो पक्षकार व शेकडो वकील खटल्याच्या निमित्ताने येत असतात. या कदंब वृक्षाची घनदाट सावली अनेकांचा आधार बनते. कमालीचा थंडावा येथे मिळतो. साधारणात: मार्चमध्ये या कदंब वृक्षाची पाने गळून जातात. गेल्या काही दिवसांपासून हा वृक्ष फुलांनी
बहरला आहे.