ओझर नगरपरिषदेसाठी कदम यांची न्यायालयात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 09:16 PM2020-12-17T21:16:41+5:302020-12-17T21:16:52+5:30
ओझर : ओझर सह राज्यातील तेरा नगरपरिषदे बाबत कार्यवाही प्रस्तावित असल्याने राज्य शासनाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका न घेता नगरपरिषदेचीच निवडणूक जाहीर करण्यात यावी यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
ओझर : ओझर सह राज्यातील तेरा नगरपरिषदे बाबत कार्यवाही प्रस्तावित असल्याने राज्य शासनाने त्यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुका न घेता नगरपरिषदेचीच निवडणूक जाहीर करण्यात यावी यासाठी माजी आमदार अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यंदाच्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर पर्यंतच्या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असताना त्यातील काही गावे ही नगरपंचायत,नगरपरिषद मध्ये रूपांतरित झाल्याची घोषणा झाल्याने मोठा संभ्रम बघण्यास मिळाला होता. परंतु शासनाने ओझरसह इतर नगरपरिषदांची प्रक्रिया सुरू केल्याने त्या गावांत ग्रामपालिका निवडणूक न घेता थेट नगरपरिषदेचीच निवडणूक घेण्यात यावी. जेणेकरून सरकारचा होणारा खर्च वाचेल. तसेच मुदत संपलेल्या स्थानिक ग्रामपालिका सदस्य देखील न्यायालयात जाऊ शकतात. त्यामुळे नगरपरिषदेची प्रक्रिया पूर्ण होण्यास काही अवधी लागणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्यात यावी असे देखील शासनाच्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकमेव नगरपरिषद म्हणून जाहीर झालेल्या ओझर ग्रामपलिकेची घोषित झालेली निवडणूक न घेता थेट नगरपरिषदची घ्यावी यासाठी अनिल कदम आग्रही असून प्रक्रियेत कुठेही अडचण नको म्हणून त्यांनी याचिका देखील दाखल केली आहे.
------------------
नगरपरिषदेत रूपांतरीत होणाऱ्या ग्रामपालिका
ओझर(नाशिक), घुग्घूस(चंद्रपुर), नातेपुते,महाळुंग श्रीपुर, अकलूज, वैराग (सोलापूर), नशिराबाद (जळगाव), तिर्थपुरी (जालना), मंचर, माळेगाव, औताडे, हांडेवाडी, शेवाळेवाडी, वडाचीवाडी(पुणे) लेहगाव, शिवर(अमरावती).