‘कडू’ घटनेनंतरही अपंगांची परवडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 12:35 AM2017-07-28T00:35:23+5:302017-07-28T00:35:48+5:30

महापालिका : विभागीय कार्यालयांमध्ये ‘रॅम्प’चा अभाव; कृती आराखड्यामध्ये समावेश नाही

kadauu-ghatanaenantarahai-apangaancai-paravadaca | ‘कडू’ घटनेनंतरही अपंगांची परवडच

‘कडू’ घटनेनंतरही अपंगांची परवडच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी अपंगांच्या प्रश्नी महापालिका प्रशासनाला जाब विचारल्यानंतर १८ कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला असला तरी, त्यात महापालिका मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचा कुठेही उल्लेख नाही. सद्यस्थितीत महापालिकेच्या विभागीय कार्यालयांमध्ये एकमेव पंचवटी कार्यालय वगळता अन्य ठिकाणी लिफ्टची सुविधा नाही. तसेच रॅम्पही नसल्याने अपंग बांधवांना पायऱ्या चढण्याचे कष्ट झेलावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेने शुक्रवार (दि.२८)पासून सहाही विभागीय कार्यालयात अपंग बांधवांना त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. परंतु, कार्यालयांच्या पायऱ्या चढण्यासाठी त्यांना द्राविडी प्राणायाम करावे लागणार आहे.
प्रहार संघटनेच्या वतीने गेल्या सोमवारी (दि.२४) महापालिका मुख्यालयासमोर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अपंगांच्या प्रलंबित प्रश्नी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर, बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासह आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली असता आयुक्त व बच्चू कडू यांच्यात वादविवाद होऊन कडू यांनी थेट आयुक्तांवरच हात उगारल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर, महापालिकेने तातडीने अपंग बांधवांना अंदाजपत्रकातील एकूण ३ टक्के रकमेतून विविध सोयी-सुविधा पुरविण्यासाठी १८ कलमी कृती आराखडा तयार करत दहा अधिकाऱ्यांवर त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविली. मात्र, या आराखड्यात महापालिकेच्या कुठल्याही विभागीय कार्यालयांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी सूचना नाहीत. ‘लोकमत’ने मनपा मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयांच्या इमारतींची पाहणी केली असता, विभागीय कार्यालयात कुठेही रॅम्पची सुविधा आढळून आलेली नाही. पंचवटी विभागीय कार्यालयाची नव्यानेच इमारत बांधण्यात आलेली आहे. राजीव गांधी भवनमध्ये एकाच ठिकाणी रॅम्पमहापालिकेच्या राजीव गांधी भवनमध्ये पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावर एक छोटेखानी रॅम्प आहे. तेथून अपंग बांधवांना लिफ्टची सुविधा आहे. परंतु, मुख्यालयातील लिफ्ट बेभरवशाची बनलेली आहे. सदर लिफ्ट कधीही
बंद पडून त्यात माणसे अडकून पडण्याच्या अनेकदा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ‘लिफ्टपेक्षा पायऱ्याच बऱ्या’ अशीच भावना धडधाकट माणसांचीही होते. महापालिका मुख्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र रॅम्पची सुविधा नाही. त्यामुळे अपंग बांधवांना पूर्व दरवाजाने जावे लागते. त्याठिकाणीही सुरक्षा व्यवस्था असते. या
प्रवेशद्वारातून पदाधिकारी, अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे बऱ्याचदा सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जात नाही. अनेकदा सदर प्रवेशद्वार कुलूपबंदच असते.

Web Title: kadauu-ghatanaenantarahai-apangaancai-paravadaca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.