कडू यांच्या बैठकांवर मनपा अधिकारी टाकणार बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 12:45 AM2017-07-26T00:45:43+5:302017-07-26T00:45:56+5:30

नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या बैठकांना उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे.

kadauu-yaancayaa-baaithakaanvara-manapaa-adhaikaarai-taakanaara-bahaisakaara | कडू यांच्या बैठकांवर मनपा अधिकारी टाकणार बहिष्कार

कडू यांच्या बैठकांवर मनपा अधिकारी टाकणार बहिष्कार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारत त्यांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या आमदार बच्चू कडू यांच्या कोणत्याही बैठकांना यापुढे उपस्थित न राहण्याचा निर्णय महापालिका अधिकारी संघटनेने घेतला आहे. त्याबाबतचे निवेदनही विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे उपाध्यक्ष अनिल महाजन यांनी दिली. आयुक्त अभिषेक कृष्ण यांना शहराबाहेरील लोकप्रतिनिधीने केलेली शिवीगाळ व धमकाविल्याबद्दल मनपातील सर्व अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि.२५) काळ्या फिती लावून कामकाज करत निषेध नोंदविला. आवश्यकता वाटल्यास बुधवारी (दि.२६) लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला. यावेळी, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, अग्निशमन दलाचे प्रमुख अनिल महाजन, उपआयुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, रोहिदास दोरकुळकर, मुख्य लेखापाल सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव, मिळकत व्यवस्थापक बी. यू. मोरे, प्रशांत मगर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय डेकाटे आदींसह विभागीय अधिकारी उपस्थित होते.


 

Web Title: kadauu-yaancayaa-baaithakaanvara-manapaa-adhaikaarai-taakanaara-bahaisakaara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.