कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा राखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 10:18 PM2020-12-22T22:18:51+5:302020-12-23T00:55:04+5:30

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे.

Kadava Mahalungi Gram Panchayat will maintain the tradition of unopposed | कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा राखणार

कादवा म्हाळुंगी ग्रामपंचायत बिनविरोधची परंपरा राखणार

Next
ठळक मुद्देग्रामस्थांची बैठक : ठरवलेले उमेदवारच अर्ज भरणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कादवा म्हाळुंगी गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक न घेता सर्व जागा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज दाखल होण्यापूर्वीच निवडणूक बिनविरोध करण्याची परपंरा गावाने कायम ठेवली आहे.

कादवा म्हाळुंगी येथील ग्रामस्थांची बैठक होऊन निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले व त्यांनीच अर्ज दाखल करावे, असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या ३५ वर्षांपासून कादवा म्हाळुंगी गावात ग्रामपंचायत निवडणूक झालेली नाही. या गावाने आतापर्यंत सात सरपंचांची निवडणूक बिनविरोध केलेली आहे. या बैठकीला गावातील तानाजी देशमुख, वसंत पिंगळ, भाऊसाहेब गुंबाडे, साहेबराव आहेर, देवीदास गांगोडे, खंडेराव आहेर, गोपीनाथ निकम, एकनाथ अनवट, माधवराव जाधव,परशराम सहाळे, जगन गांगोडे, रमेश आहेर, सुरेश शिंदे,दामोधर बुनगे, हभप.छबू महाराज, हभप कृष्णा महाराज, रघुनाथ बोके, राजेद्र चौरे, माणिक चौरे, भिका सहाळे, संजय लिलके, कविता गांगोडे,जिजाबाई गांगोडे, कुसुम सहाळे, सुमनबाई लिलके, रंजना गुबाडे, सरला वाघ, आदीसह गावातील युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

कीर्तनकारांचे गाव
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. २३ डिसेंबरपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वीच कादवा माळूगी गावाने बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखली आहे. बिनविरोध होणारी नाशिक जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. गावात घराघरात कीर्तनकार असल्याने या गावाला प्रति आळंदी म्हटले जाते. सलग आठव्यांदा ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे.

Web Title: Kadava Mahalungi Gram Panchayat will maintain the tradition of unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.