लासलगाव येथे आठवडाभर कडेकोट बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:28 PM2021-04-18T18:28:17+5:302021-04-18T18:28:29+5:30
लासलगाव : कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार कडेकोट बंद होता. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सांगितले.

लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरीकांना लासलगाव परीसरात कोविड - १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने १९ पासुन २५ एप्रिल पर्यंत दवाखाने आणि मेडिकल सोडून इतर संपुर्ण व्यवसाय बंद ठेऊन लासलगावमध्ये लॉकडाऊन ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
या तारखेदरम्यान फक्त आत्यवश्यक सेवाच चालु राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतीरीक्त सर्व दुकाने, भाजीपाला हे बंद ठेऊन सहकार्य करावे व कोरोना ची साखळी तोडण्यासाठी व गावाच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे. (१८ लासलगाव)