कृषिरथ माघारी धाडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:22 AM2018-08-09T00:22:17+5:302018-08-09T00:22:22+5:30

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत.

Kadirath sent back | कृषिरथ माघारी धाडला

कृषिरथ माघारी धाडला

Next
ठळक मुद्देसदस्य संतप्त : कृषी विभाग शेतकऱ्यांना माहिती देत नसल्याचा आरोप

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी कृषी मंडळाने शेतकºयांना जनजागृती रथ येणार असल्याबाबत कोणतीही माहिती न देता बोलविण्यात आलेला रथ संतप्त ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी शुभारंभाचे नारळ न वाढविताच माघारी धाडल्याची घटना बुधवारी सकाळी घडली.
जून महिन्यापासून वावी कृषी मंडळ अधिकारी पद रिक्त आहे. सिन्नरच्या पूर्व भागात पाऊस नसल्याने शेतकºयांनी पेरणी केलेली पिके करपली आहेत. कृषी विभागाकडून या पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याची अपेक्षा असताना कृषी विभाग कापशीवरील बोंडअळी नियंत्रणासाठी जनजागृती रथ फिरवत असल्याबाबत व या उपक्रमास वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहात नसल्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी नाराजी व्यक्त करून शेतकºयांना न बोलविता जनजागृती करताच, कशी असा सवाल उपस्थित करून जनजागृती रथाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
कृषी विभाग व महिको कंपनीच्या संयुक्त विद्यमाने गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी वावी मंडळांतर्गत शेतकºयांसाठी जनजागृती रथाच्या शुभारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही शेतकºयास माहिती न देताच अचानकपणे वावी येथे सकाळी १० वाजेच्या सुमारास या जनजागृती रथाचे ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आगमन झाले. सरपंच नंदा गावडे, उपसरपंच विजय काटे यांच्यासह काही मोजक्याच ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांना बोंडअळी जनजागृती कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आमंत्रण धाडण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमास प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी उपस्थित होते. त्यामुळे उपसरपंच विजय काटे यांनी रथाच्या शुभारंभाचे नारळ वाढविण्यास नकार देत अगोदर जळून चालेल्या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली. औपचारिकता म्हणून फिरविला रथशेतकºयांना माहिती द्या आणि मग जनजागृती कार्यक्रम घ्या, असा सल्ला देत सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे उपस्थित कृषी कर्मचाºयांना रथ घेऊन परिसरातील गावांतून शेतकरी असो वा नसो केवळ औपचारिकता म्हणून रथ फिरविण्याची वेळ आली.
गेल्या वर्षी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे यावर्षी कृषी विभाग व माहिको कंपनीकडून जनजागृतीसाठी या रथाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र नियोजनाच्या अभावामुळे वावीच्या मंडळ कृषी कार्यालयावर नामुष्कीची वेळ आल्याची चर्चा होती.शेतकºयांना कोणतीही माहिती न देता कृषी विभागाने बोंडअळी नियंत्रण जनजागृतीचा रथ बोलविला. जनजागृती करण्यास आमचा विरोध नाही, उलट सदर उपक्रम स्तुत्यच आहे. मात्र कार्यक्रमास केवळ व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकºयांना याची कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे नारळ वाढवून शुभारंभ केला नाही. पावसाअभावी पिके करपून चालली आहे. त्याचे पंचनामे करण्याची मागणी केली. वावी मंडळाकडून शेतकºयांना कोणत्याही कृषी योजनांची माहिती दिली जात नाही.
- विजय काटे, उपसरपंच, वावी

Web Title: Kadirath sent back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक