कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 10:56 PM2018-10-03T22:56:35+5:302018-10-03T22:57:09+5:30
दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.
दिंडोरी : केंद्र सरकारने इथेनॉलबाबत योजना जाहीर करत कारखान्यांना त्याचा लाभ घेण्यास सांगितले आहे. त्याबाबत कादवाने सदर विस्तारीकरण व इथेनॉल प्रकल्प राबवणे काळाची गरज असून, कादवाने इथेनॉल प्रकल्प राबवावा, ऊस उत्पादक सभासद संचालक मंडळाच्या पाठीशी उभे राहतील, असा विश्वास ननाशी येथील ऊस उत्पादक सभासद शेखर देशमुख यांनी व्यक्त केला.
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने ऊस लागवड व एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कार्यक्षेत्रातील देहरे, गांडोळे, ननाशी, पिंपळपाडा, वनारे, देवठाण, टिटवे आदी गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ननाशी येथे झालेल्या बैठकीत शेखर देशमुख बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे होते.
संचालक मंडळाचे गेल्या अकरा वर्षांचे कामकाज पाहता सर्वांचा त्यांच्यावर विश्वास आहे. साखर उद्योग व त्यापुढील अडचणी आपण दररोज प्रसारमाध्यमांमध्ये बघत आहोत. केंद्र सरकारने या उद्योगाला सावरण्यासाठी इथेनॉलचे भाव वाढवून देत इथेनॉलनिर्मितीवर भर देण्याचे कारखान्यांना सांगितले आहे. त्यासाठी पॅकेजही जाहीर केले आहे, त्याचा लाभ घेणे ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे उसाला अजून भाव मिळणार असल्याने कार्यक्षेत्रात निश्चित ऊस लागवड वाढणार आहे. भविष्याचा विचार करता कादवाने आपली गाळप क्षमता वाढवावी व इथेनॉल प्रकल्पाची तयारी करावी, असे आवाहन देशमुख यांनी केले.
यावेळी बोलताना श्रीराम शेटे यांनी, कादवाने २५०० मे. टन गाळपाच्या दृष्टीने यापूर्वीच विविध मशिनरी दुरुस्ती करताना त्या क्षमतेच्या केल्या आहेत. आता फक्त बॉयलर, टर्बाइन व मिल बसविणे बाकी आहे, असे सांगितले. यावेळी संचालक विश्वनाथ देशमुख, संपतराव कोंड, रघुनाथ दिघे तसेच दिंडोरी गटातून सातत्याने सर्वाधिक ऊस पुरवठा करणारे राजेंद्र देशमुख, भास्कर चौधरी, मुरलीधर कहाणे, सुरेश कदम, सुदाम पवार, सोमनाथ हिंडे, जगन्नाथ नवले, मुरलीधर चौधरी, राजेंद्र ढगे, मच्छिंद्र शिरसाठ उपस्थित होते. ऊस लागवड करण्याची शेतकºयांची ग्वाहीकादवा सहकारी साखर कारखाना उसाला चांगला भाव देत आहे. कारखान्याच्या विस्तारीकरणासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत आहे. चेअरमन श्रीराम शेटे दरवर्षी गावोगावी बैठका घेऊन ऊस लागवड वाढीसाठी आवाहन करत आहेत. त्यामुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून, केंद्र सरकारने साखर उद्योगाबाबत उत्तम धोरण आखल्याने याचा लाभ शेतकºयांना होणार आहे. कादवाने विस्तारीकरण व इथेनॉलची तयारी करावी. त्यासाठी आम्ही पश्चिम भागातील शेतकरी जास्तीत जास्त व आधुनिक पद्धतीने ऊस लागवड करू, अशी ग्वाही देवठाण येथील शेतकरी जगन्नाथ नवले यांनी दिली.