रेल्वेमार्गाला जमीन देण्यास ‘कही खुशी, कही गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 11:22 PM2020-02-17T23:22:18+5:302020-02-18T00:18:59+5:30
नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.
नायगाव : नाशिक - पुणे सेमी हायस्पिड रेल्वेच्या सुधारित आराखड्याला मध्य रेल्वेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व्हे झालेल्या नायगाव खोºयातील शेतजमिनी अधिग्रहण होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. रेल्वेमार्गाला जमीन देण्यास शेतकºयांमध्ये ‘कही खुशी, कही गम’ अशी अवस्था बघायला मिळत आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुचर्चित नाशिक-पुणे रेल्वेमार्गाला केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून व राज्य शासनाकडून हिरवा कंदील मिळताच या मार्गाच्या कामाला सुरुवात होणार आहे. असे असले तरी मध्य रेल्वेच्या मंजुरीमुळे हा मार्ग होणार हे नक्की मानले जात आहे. त्यामुळे खोºयातील मोह, वडझिरे, ब्राह्मणवाडे, जायगाव, देशवंडी आदी गावांतील ज्या शेतकºयांच्या शेतातून मोजणी झाली आहे, अशा शेतकºयांमध्ये जमिनी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गेल्या अनेक वर्षांपासून अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेले शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे बेभरवशाच्या शेती व्यवसायाला कंटाळलेले शेतकरी या मार्गासाठी जमीन देण्यास तयार असल्याचे बोलले जात आहे, तर अनेक शेतकरी या मार्गातून आपली जमीन वाचविण्यासाठी मार्ग शोधत आहेत.
गेल्या २०-२२ वर्षांपासून नाशिक-पुणे रेल्वेमार्गाची वारंवार चर्चा होत होती. या मार्गासाठी नायगाव खोºयातून अनेकदा विविध ठिकाणाहून जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या कार्यकाळात या मार्गाची अर्थसंकल्पात तरतूद केल्याने हा मार्ग लवकरच पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र सध्या या मार्गाचे काम थोड्याच दिवसात सुरुवात होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक, मोहदरी, सिन्नर, दोडी, चास, देवठाण, संगमनेर, अंबुरे, साकूर, जांबूत, बोटा, आळेफाटा, नारायण गाव, मंचर, भोरवडी, राजगुरुनगर, चाकण, आळंदी, वाघोली, कोलवडी, मांजरी, हडपसर, पुणे असे या मार्गातील प्रस्तावित थांबे आहे. तसेच नाशिक व पुण्यामधील औद्योगिक क्षेत्रातही थांबे असणार आहे. नायगाव खोºयातील जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह आदी गावांतून आजपर्यंत अनेकवेळा रेल्वेमार्गाची मोजणी करण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे सध्याच्या मंजुरीनंतरही हे काम सुरू होणार का, असा प्रश्न सध्या शेतकºयांना पडला आहे. अशातच परिसरातील विविध भागातून ही मोजणी झाली असल्यामुळे नेमक्या कोणत्या ठिकाणाहून हा मार्ग जाणार आहे, त्याबाबत शेतकºयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.