कैलास पवार : देवळा येथे राष्टÑीय ग्राहक दिन सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 11:54 PM2018-01-04T23:54:25+5:302018-01-05T00:21:23+5:30

देवळा : आपले सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर सर्वांचा भर असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. यात फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. हे आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले.

Kailas Pawar: On the national customer day, all the transactions are done online at Deola | कैलास पवार : देवळा येथे राष्टÑीय ग्राहक दिन सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर भर

कैलास पवार : देवळा येथे राष्टÑीय ग्राहक दिन सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर भर

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमग्राहक नाडला जाण्याच्या तक्रारी

देवळा : आपले सर्व व्यवहार आॅनलाइन करण्यावर सर्वांचा भर असून, त्यात सातत्याने वाढ होत आहे. यात फसवणूक होण्याच्या घटना घडत आहेत. हे आॅनलाइन व्यवहार करताना ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहकांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी केले. राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. वैधमापनशास्त्र विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कार्यक्रमास उपस्थित नसल्याबद्दल ग्राहक मंच सदस्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
येथील तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार कैलास पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी सहायक निबंधक संजय गिते, तालुका कृषी अधिकारी संजय गुंजाळ, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता कैलास शिवदे, देवळा तालुका ग्राहक मंचचे अध्यक्ष संजय मांडगे, निंबाजी अहेर, संजय देवरे, सनी परदेशी आदी ग्राहक मंचचे सदस्य उपस्थित होते. संजय देवरे यांनी प्रास्ताविक केले. ग्राहकांची दुकानदारांकडून विविध प्रकारे होणाºया फसवणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सध्या ग्राहक नाडला जाण्याच्या तक्रारी वाढत आहेत. २४ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा झाल्यानंतर ग्राहकांना योग्य ते संरक्षण मिळाले. परंतु ग्राहक म्हणून असलेल्या हक्कांची फारशी माहिती नागरिकांना नाही.
यासाठी ग्राहकांना उत्पादन व बाजारपेठेबाबत साक्षर करण्यात ग्राहक मंच जनजागृती करून मोलाची भूमिका बजावू शकतो, असे प्रतिपादन तहसीलदार कैलास पवार यांनी यावेळी केले. ग्राहक मंचने वर्षभरात फसवणुकीची किमान एक बाब तरी उघडकीस आणावी, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. गतवर्षी राष्ट्रीय ग्राहक मंंच दिनाच्या झालेल्या बैठकीत ग्राहक मंचने केलेल्या मागणीनंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याचा नमुना दुकानात दर्शनी भागात ठेवण्याच्या सूचना तहसीलदारांनी दिल्या होत्या त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. संजय देवरे यांनी आभार मानले. बैठकीस शिक्षण विस्तार अधिकारी सतीश बच्छाव, अनंत आहिरराव, पुरवठा विभागाचे कर्मचारी, स्वस्त धान्य दुकानदार, रॉकेल विक्रेते, आदी उपस्थित होते.

Web Title: Kailas Pawar: On the national customer day, all the transactions are done online at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.