बच्चे कंपनीसाठी आता ‘काैन बनेगा लोकमत जीनिअस’ स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:50+5:302021-04-24T04:14:50+5:30
काेरोनामुळे सध्या मुलांना घरी बसून कंटाळवाणे वाटत आहे. तेच ते गेम आणि ऑनलाइन अभ्यास करून कंटाळलेल्या मुलांसाठी ही स्पर्धा ...
काेरोनामुळे सध्या मुलांना घरी बसून कंटाळवाणे वाटत आहे. तेच ते गेम आणि ऑनलाइन अभ्यास करून कंटाळलेल्या मुलांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांना या स्पर्धेत सहभागी होता येईल. बौध्दिक कौशल्याला चालना देणारी ही जनरल नॉलेजवर आधारित स्पर्धा आहे. ही स्पर्धा ८ मे राेजी सकाळी ११ ते १२ या वेळात होणार आहे. प्रवेश शुल्क शंभर रुपये असून ३ मे पर्यंत स्पर्धेसाठी रजिस्ट्रेशन करता येईल. पूर्णत: इंग्रजी माध्यमात ही स्पर्धा असून यात यश मिळवणाऱ्या मुलांना गुणवत्तेनुसार गोल्ड, सिल्वर आणि ब्रांझ मेडल देण्यात येईल. शाळेनुसार प्रत्येक प्रत्येक टॉपरला लाईव्ह कॉम्पिटशनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला सरावासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ७७९८६३६५७७, ९८२२७९४५०५, ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
----
शनिवार दि २४ एप्रिलसाठी
या बातमीत कॅम्पस क्लबचा लोगो वापरावा..
शहर आणि ग्रामीण आवृत्तीसाठी