हिवाळ्यात झाडाला लागल्या कैऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 06:22 PM2018-11-25T18:22:04+5:302018-11-25T18:22:21+5:30
येवला तालुक्यातील राजापूर येथील अलगट वस्तीवरील शेतकरी गंगाधर म्हतारबा अलगट यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला ऐन हिवाळ्यात कैºया लागल्या आहेत.
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील अलगट वस्तीवरील शेतकरी गंगाधर म्हतारबा अलगट यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला ऐन हिवाळ्यात कैºया लागल्या आहेत.
अलगट वस्तीवरील शेतकरी गंगाधर अलगट यांचे येवला नांदगाव रोडवरील अलगट वस्तीवर शेती आहे. या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या झाडाला दिवाळीच्या काळात आंबे लागल्याचे दिसून आले. ही माहिती समजताच जो तो कुतूहलाने आंबे पाहण्यासाठी जात असल्याने अनेक तर्क वितर्क काढले जात आहेत. निसर्ग नियमानुसार आंब्याच्या बहार वसंत ऋतूमध्ये मोहर येऊन होळीच्या सणानंतर आंब्याच्या कैºया पहावयास मिळतात. मात्र, या वर्षी ऐन दिवाळीत आंब्याला कैर्या लगडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे बदलत्या काळामुळे निसर्गही बदलला तर नाही ना..असा प्रश्न आंबे पाहणार्यांना पडतो आहे.
या आबांच्या झाडाला ७५ वर्षात पहिल्यांदाच नोव्हेंबर मिहन्यात ऐन हिवाळयात आंबा आल्याने दुष्काळ पडण्याची चिन्हे दर्शवित असल्याचे शेतकरी गंगाधर म्हतारबा अलगट यांनी सांगितले.