काकाणी विद्यालयांच्या क्रीडामहोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:58 PM2019-12-14T22:58:03+5:302019-12-15T01:01:48+5:30
मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.
संगमेश्वर : येथील मालेगाव एज्युकेशन सोसायटी संचलित झुं.प. काकाणी विद्यालय, कै. श्री. रा.क. काकाणी कनिष्ठ महाविद्यालय, सौ. रूं. झु. काकाणी कन्या विद्यालय व नवीन प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१३ पासून क्रीडामहोत्सवास क्र ीडा ज्योतीने प्रारंभ करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष विलास पुरोहित यांनी क्रीडा ज्योत प्रज्वलित केली. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन नितीन पोफळे, संचालक भोगीलाल पटेल, प्राचार्य तुकाराम मांडवडे, मुख्याध्यापक शोभा मोरे, कविता मंडळ, उपप्राचार्य नारायण चौधरी, पर्यवेक्षक अनिल गोविंद, राजेंद्र परदेशी, क्र ीडाशिक्षक नरेश शेलार हजर होते. विद्यालयातील राष्ट्रीय, राज्य व विभागीय स्तरावर क्र ीडा स्पर्धेत विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या स्नेहल वाणी, गौरी साइनकर, जयेंद्र महाजन तसेच आजी व माजी विद्यार्थ्यांसह खेळाडूंनी क्रीडा ज्योत काकाणी विद्यालयात आणली. खो-खो, कबड्डी, रस्सीखेच, कुलूपकिल्ली खेळांचे सामने झाले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना वाव मिळत असतो. विजेत्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जातो.