काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:33 AM2020-02-24T00:33:06+5:302020-02-24T00:56:26+5:30

जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Kakasaheb Gharapurkar passes away | काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

काकासाहेब घारापूरकर यांचे निधन

Next

नाशिक : जुन्या पिढीतील गायक, संवादिनी वादक आणि गुरु पं. काकासाहेब घारापूरकर (९६) यांचे रविवारी सकाळी निधन
झाले. सायंकाळी अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रख्यात गुरु आणि विद्वान पं. स. भ. देशपांडे यांच्याकडे काकासाहेब घारापूरकर यांचे अभिजात संगीताचे शिक्षण झाले होते. नोकरीच्या निमित्ताने नाशिकमध्ये स्थायिक झाल्यानंतर येथे त्याकाळात अनेक मोठ्या कलावंतांचे कार्यक्र म आयोजित केले. याशिवाय अनेक नामवंत कलावंतांना त्यांनी संवादिनीची साथसंगत केली. त्यात पं. बसवराज राजगुरू, पं. वसंतराव देशपांडे, पं. पद्माकर कुलकर्णी, पं. राजा काळे अशा अनेक प्रसिद्ध कलावंतांचा समावेश होता. त्या काळात नाशिक म्युझिक सर्कलची स्थापना करण्यासह जिल्हा सांस्कृतिक संघटनेचे ते महत्त्वाचे सदस्य होते. या संस्थेतर्फे नाशिकमध्ये दरवर्षी शास्त्रीय संगीताचा मोठा महोत्सव होत असे. त्याचप्रमाणे नाशिकच्या मेनरोडवरील गणपती मंदिरातील शास्त्रीय संगीताची परंपरा त्यांनी अनेक वर्ष चालवून संगीत सेवा केली. संगीतकार म्हणूनही त्यांनी काम केलेले असून, त्यांनी संगीत दिलेली योगगीतेही प्रसिद्ध आहेत. नाशिकमध्ये पूर्वी कलाअर्घ्य संस्थेने सादर केलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकाच्या संगीत संयोजनाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गुरू म्हणून देखील पं. घारापूरकर यांनी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून, त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये सुनील देशपांडे, मृदुला देव यांचा समावेश आहे.

Web Title: Kakasaheb Gharapurkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.