कळसूबाईमाता घट कलशाचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 11:31 PM2018-10-10T23:31:33+5:302018-10-10T23:32:30+5:30
इगतपुरी : सलग २२ वर्षांपासून राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर घोटीचे ट्रेकर व कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा मनसेचे जिल्हा संघटक भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली परिसर स्वच्छता व नवरात्र काळात रोज पहाटे ४ वाजता जाऊन विधिवत पूजन व स्वच्छता करीत असतात. आज त्याच कार्याची दखल घेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व सौ. शर्मिला ठाकरे यांनी कळसूबाई मातेच्या घट कलशाचे विधिवत पूजन करून घोटीच्या ट्रेकर्सचे कौतुक केले.

दरम्यान, बुधवारी (दि. १०) घटस्थापना होत असून, त्या पार्श्वभूमीवर कळसूबाई शिखरावर ट्रेकर्सनी परिसरात स्वच्छतेसह रंगरंगोटीचे काम पूर्ण केले असून, पहाटे ४ वाजता विधिवत पूजन झालेल्या कलशाची घटस्थापना घोटीचे ट्रेकर्स करणार आहेत.
कृष्णकुंज येथे झालेल्या कलशपूजनाच्या वेळी राज ठाकरे यांनी घोटीच्या ट्रेकिंगवीरांना शाबासकी देत त्यांच्या कार्याची दखल घेतली.
यावेळी कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, अभिजित कुलकर्णी, रामदास आडोळे, दीपक चव्हाण, आत्माराम मते, अशोक हेमके, प्रशांत जाधव, प्रवीण भटाटे, संतोष म्हसणे, बालाजी तुंबरे, सोपान चव्हाण, प्रशांत येवलेकर, गजानन चव्हाण, नीलेश पवार, बाळू आरोटे, दीपक बेलेकर आदी मनसे पदाधिकारी व गिर्यारोहक उपस्थित होते.
दरम्यान, या गिर्यारोहकांना मनसे नेते अविनाश अभ्यंकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम यांनी शुभेच्छा दिल्या. गेल्या २२ वर्षांपासून घोटीच्या कळसूबाई मित्रमंडळाच्या वतीने सलग नऊ दिवस मंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही सेवा करीत असतो.
- अशोक हेमके, ट्रेकर