कलानगरला दुचाकीने घेतला पेट

By admin | Published: April 20, 2017 05:25 PM2017-04-20T17:25:19+5:302017-04-20T17:25:19+5:30

रहिवाशांची पळापळ : अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

Kalanagara bicycling took place | कलानगरला दुचाकीने घेतला पेट

कलानगरला दुचाकीने घेतला पेट

Next

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
कलानगर येथील एव्हरेस्ट हाइट्स इमारतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या एका दुचाकीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. आगाचे लोट पाहताच रहिवाशांची धावपळ झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशामक दलास फोन केला असता तातडीने सिडको अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहनास लागलेली आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दुचाकीतील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वाहनाने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच वाहनतळातून हवा पास होण्यासाठी मुबलक जागा नसल्यामुळे वाहनाने पेट घेतल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. बघ्यांनी गर्दी केल्याने आग विझविण्यास अडचण येत होती. प्रत्येक इमारतीत आगप्रतिबंधक यंत्र बसविणे आवश्यक असताना या इमारतीत सदर यंत्र नसल्याने आग तातडीने विझविता आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Kalanagara bicycling took place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.