कालभैरवनाथ महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:11 AM2020-12-08T04:11:56+5:302020-12-08T04:11:56+5:30
यंदा देशभरात कोरोना संसर्ग सावट पसरलेले असल्याने साध्या पद्धतीने फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत उत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग ...
यंदा देशभरात कोरोना संसर्ग सावट पसरलेले असल्याने साध्या पद्धतीने फिजिकल डिस्टन्सिंग पालन करत उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा पालखी मिरवणूक सोहळा रद्द करण्यात आला. त्याचबरोबर मंदिर परिसरात सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मुख्य मंदिरापासून ५ ते ७ फुटांवरून दर्शन घ्यावे लागत होते. दरवर्षी राजेबहाद्दर वाडा येथून पालखी अभिषेक पूजन करत कालभैरवनाथ महाराज पालखी मिरवणूक काढली जाते मात्र यावेळी पालखी सोहळा रद्द करण्यात आला. सकाळी कालभैरव मंदिरात पूजन व अभिषेक करण्यात आला त्यानंतर देवाला नैवेद्य दाखविण्यात आला. पंचवटीत सर्वांत जुने मंदिर असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले, तर दर्शनासाठी येणारे भाविक बाजरीची भाकर व वांगे भरीत नैवेद्य चढवित होते.