बोकटे गावात कालभैरवनाथ यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:12 AM2018-04-09T00:12:26+5:302018-04-09T00:12:26+5:30
अंदरसूल : बोकटे या गावात कालभैरवनाथ यात्रोत्सव रविवारपासून (दि.८) सुरू झाला आहे. बोकटे गाव भैरवनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.
अंदरसूल : बोकटे या गावात कालभैरवनाथ यात्रोत्सव रविवारपासून (दि.८) सुरू झाला आहे. बोकटे गाव भैरवनाथ मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तीस आणल्यास तो बरा होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बोकटे, देवळाणे, दुगलगाव, गवंडगाव, सुरेगाव, अंदरसूल व पंचक्रोशीतील गावातील नागरिक या यात्रेनिमित्त जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य महेंद्र काले हे सर्वांना बरोबर घेऊन यात्रेचे नियोजन करीत आहेत. भाविकांची नाशिक, नगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव या जिल्ह्यातून वर्दळ असते. पालखेड कालव्याचे पाणी यावर्षी वेळेपूर्वी सोडण्यात आले; मात्र यावर्षी कमाल तपमान असल्याने उष्णतेने नदीपात्रातील व विहिरींच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. ग्रामपंचायत, वीज वितरण कंपनी, पोलीस खाते, आरोग्य खाते, सेवाभावी संघटना, ग्रामस्थ बोकटे हे सर्व प्रयत्नशील आहेत. भैरवनाथ मंदिर व परिसर याच्या निर्माणासाठी पंचक्रोशीतील व गावातील तसेच विविध शासकीय निधी यातून मंदिर आज उभे आहे.