दळेंच्या निराधार चिमुकल्यांचा काळेंनी उचलला भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:03+5:302021-06-28T04:11:03+5:30

‘कोरोनाने हिरावलेल्या माता-पित्यांच्या चिमुकल्यांची गोष्ट’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये दि. १ जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्त ...

Kale lifted the burden of the helpless chimpanzees of the forces | दळेंच्या निराधार चिमुकल्यांचा काळेंनी उचलला भार

दळेंच्या निराधार चिमुकल्यांचा काळेंनी उचलला भार

googlenewsNext

‘कोरोनाने हिरावलेल्या माता-पित्यांच्या चिमुकल्यांची गोष्ट’ या मथळ्याखाली लोकमतमध्ये दि. १ जून रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदर वृत्त वाचल्यानंतर दिनकर काळे यांनी त्या मुलांना मदत करण्याचे ठरवले. लक्ष्मीनगर येथील शेषराव दळे व त्यांची पत्नी यांचे कोरोनाने निधन झाल्याने इयत्ता चौथीत शिकणारा राज व सातवीतला ओम यांचे शैक्षणिक भविष्य अंधारमय झाले. घरात गतिमंद काका व अर्धांगवायूमधून सावरणारी आजी हेच उरले. दळे यांचे या कुटुंबाची करुण कहाणी ऐकून हृदय द्रवले. त्यांनी मुलांना शिक्षणासाठी काहीही कमी पडू न देण्याचा संकल्प केला. त्याची सुरुवात म्हणून सायकल, वह्या, कंपास, दप्तर, ड्रेस, बूट इत्यादी साहित्य घेऊन ते दळे यांच्या घरी गेले. सदर साहित्य मुलांच्या हाती सुपूर्द करताना भविष्यात कोणत्याही गोष्टीची गरज पडली तर संपर्क करा, काहीही कमी पडू देणार नाही, असा आश्वासक दिलासाही दिला. त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर फुटलेले स्मितहास्य आणि आजीचा खुललेला चेहरा उपस्थितांचे मन हेलावून गेला. लक्ष्मीनगरचे सरपंच बापूसाहेब जाधव, कैलास सोनवणे, शिक्षक साईनाथ महाडिक, सुकदेव दळे, बाबासाहेब दळे, सीताराम महाडिक, मच्छींद्र घाडगे, नवनाथ आहेर यावेळी उपस्थित होते.

कोट.....

शाळेत शिक्षण घेणाऱ्या पालकांच्या अडचणी माहिती असल्याने आई-वडीलच परलोकी गेलेल्या मुलांचे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले व त्यातूनच त्यांना मदतीचा निर्णय घेतला. मी केवळ माझे सामाजिक भान जपले असून भविष्यातही त्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू देणार नाही.

- दिनकर काळे

फोटो - २७ लक्ष्मीनगर

कोरोनात आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या लक्ष्मीनगरमधील दळे कुटुंबीयातील मुलांना शैक्षणिक साहित्यासह सायकल भेट देताना दिनकर काळे.

===Photopath===

270621\27nsk_8_27062021_13.jpg

===Caption===

फोटो - २७लक्ष्मीनगर कोरोनात आईवडिलांचे छत्र हरवलेल्या लक्ष्मीनगरमधील दळे कुटुंबियातील मुलांना शैक्षणिक साहित्यासह सायकल भेट देताना दिनकर काळे.

Web Title: Kale lifted the burden of the helpless chimpanzees of the forces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.