केळझर धरणाचे जलपुजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 02:57 PM2018-09-03T14:57:21+5:302018-09-03T14:57:36+5:30
डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले.
डांगसौंदाणे : बागलाणच्या पश्चिमपट्यास वरदान ठरलेले केळझर (गोपाळसागर) धरण पुर्ण क्षमतेने भरले असून आमदार दिपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते विधिवत धरणाच्या पाण्याचे जलपुजन करण्यात आले. सटाणा शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भुमिका असलेले केळझर (गोपाळसागर) धरण गत सप्ताहात ओव्हरफ्लो झाले.परिसरात गेल्या दोन-तिन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. धरण कार्यक्षेत्रावर जावून चव्हाण यांनी जलपुजन केले.
यावेळी सटाना बागायतदार संघाचे अध्यक्ष झिप्रू सोनवणे, ज्येष्ठ विधीतज्ञ सरोज चंद्रात्रे, सटाणा बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे, संजय बिरारी राष्टÑवादीचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, नगरसेविका सुरेखा बच्छाव, डांगसौंदाणेचे उपसरपंच विजय सोनवणे,पाटबंधारे विभागाचे उपअभियंता एस आर पाटील उपस्थित होते.