काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 10:06 PM2020-02-29T22:06:07+5:302020-02-29T22:09:20+5:30
नांदुरवैद्य : नांदगाव बुद्रुक येथील जगदंबा माता मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची नामदेव महाराज डोळस यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरवैद्य : नांदगाव बुद्रुक येथील जगदंबा माता मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची नामदेव महाराज डोळस यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.
सप्ताह काळात वेगवेगळ्या विषयांवर विविध नामवंत कीर्तनकारांकडून समाजप्रबोधन करण्यात आले. डोळस महाराज यांनी कीर्तनातून आईवडिलांचा सांभाळ करावा, असे आवाहन केले. आईवडिलांची सेवा हाच धर्म असल्याचे त्यांनी सांगितले. डोळस महाराजांनी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यापासून बालपणी केलेल्या लीलांचे वर्णन त्याचप्रमाणे अवतार संपेपर्यंत जीवनप्रवासावर प्रबोधन केले.
साकूर येथील सप्ताह समितीच्या वतीने सहाणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. दहीहंडीच्या कार्यक्रमाने सप्ताहाची सांगता करण्यात आली. जाधववाडीचे सरपंच दत्तात्रय जाधव व ज्ञानेश्वर महाराज मोरे यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.