निमित्त कालिदास दिनाचे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:52 AM2018-07-14T00:52:07+5:302018-07-14T00:54:27+5:30
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा पहिलाच कार्यक्रम झाला.
नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह नूतनीकरणासाठी एक वर्षभर बंद असल्याने सांस्कृतिक कार्यक्र म बंद होते. मात्र, वर्षभरानंतर नूतनीकरण झालेले कालिदास कलामंदिर रंगकर्मींसाठी सज्ज झाले असून, महाकवी कालिदास दिन उत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १३) महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते प्रतिमापूजनाचा पहिलाच कार्यक्रम झाला. यावेळी आयुक्त तुकाराम मुंढे, शिक्षणाधिकारी नितीन उपासनी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, सचिव सुनील ढगे, सुनील परमार, प्रवीण कांबळे, विजय हिंगणे आदी उपस्थित होते. कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याची नाशिककरांना उत्कं ठा लागलेली असताना शुक्रवारी महाकवी कालिदास यांच्या दिनानिमित्त नाट्यगृहात प्रतिमापूजन करण्यात आले. त्यानंतर महापालिकेच्या शिक्षण विभागाचा कार्यक्रमही येथेच झाला. त्यामुळे नूतनीकरण केलेल्या क ालिदास कलामंदिरचे उद्घाटनच झाले की काय, अशी चर्चा साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रासोबतच राजकीय क्षेत्रातही होताना दिसून आली. नूतनीकरणानंतर कालिदासचे लोकार्पण झाले नसले, तरी महाकवी कालिदास यांची जयंती व शैक्षणिक कार्यक्रमासाठी आलेले शहरातील कलारसिक व शिक्षक कालिदास कलामंदिरची नूतनीकरण झालेली वास्तू पाहून भारावून गेल्याचे दिसून आले.
नूतनीकरणानंतर चाचणी
महापालिकेने सभागृहात कालिदास कलामंदिरच्या नूतनीकरणानंतर शैक्षणिक सभा घेत नाट्यगृहातील प्रकाशयोजना, ध्वनी व्यवस्था, तसेच बैठक व्यवस्थेची चाचणी घेतली. या व्यवस्थेबद्दल सर्वांनीच समाधान व्यक्त केले. बैठक व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा तसेच ध्वनी व्यवस्था चांगले काम करीत असल्याचे समाधान महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाºयांच्या चेहºयावर दिसून आले.