एचएएल हायस्कूलमध्ये कालिदास जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:05 AM2021-07-13T04:05:05+5:302021-07-13T04:05:05+5:30
प्रारंभी मुख्याध्यापक डी. के. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. संस्कृत शिक्षिका एस. टी. ...
प्रारंभी मुख्याध्यापक डी. के. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रतिमा पूजन करण्यात आले. संस्कृत शिक्षिका एस. टी. गुंजाळ यांनी प्रास्ताविकात महाकवी कालिदास यांच्याबद्दल माहिती सांगितली.
याप्रसंगी नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदासच्या संस्कृत साहित्यकृतीवरील प्रसंगावर नाट्य, नृत्य, संस्कृत गीते सादर केली. मुख्याध्यापक पवार यांनीही महाकवी कालिदास यांच्या काव्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते. सूत्रसंचालन सृष्टी सोनवणे हिने तर संस्कृत शिक्षिका पवार यांनी आभार मानले.
फोटो - १२ ओझरटाऊनशिप १
ओझरटाऊनशिप येथील एचएएल हायस्कूलमध्ये आयोजित महाकवी कालिदास जयंती कार्यक्रमात नाट्यप्रसंग सादर करताना विद्यार्थिनी.
120721\12nsk_14_12072021_13.jpg
ओझरटाऊनशिप येथील एचएएल हायस्कूलमध्ये आयोजित महाकवी कालिदास जयंती कार्यक्रमात नाट्यप्रसंग सादर करताना विद्यार्थीनी.