कालिदास कलामंदिरची तिकीट खिडकी प्रवेशद्वारी

By admin | Published: November 22, 2015 10:56 PM2015-11-22T22:56:34+5:302015-11-22T22:57:31+5:30

जानेवारीपासून प्रारंभ : अंतर्गत सुधारणांवरही भर

Kalidas Kalamandir ticket window entrance | कालिदास कलामंदिरची तिकीट खिडकी प्रवेशद्वारी

कालिदास कलामंदिरची तिकीट खिडकी प्रवेशद्वारी

Next

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरचे रुपडे बदलण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासन तत्पर झाले असतानाच गेल्या काही वर्षांपासूनच तिकीट खिडकीबाबतचा सुरू असलेला वादही शमविण्याचा विचार प्रशासनाने केला आहे. त्यानुसार जानेवारी २०१६ पासून तिकीट खिडकी हलवून ती प्रवेशद्वारावरील जागेत नेण्यात येणार आहे.
महाकवी कालिदास कलामंदिरातील अव्यवस्थेबाबत अभिनेता भरत जाधव, प्रशांत दामले यांच्यापासून मोहन जोशींपर्यंत अनेकांनी नाराजी दर्शविल्यानंतर महापालिका प्रशासन जागचे हलले आणि अनेक किरकोळ सुधारणांवर भर देण्यास सुरुवात केली. अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांनी त्यासाठी पुढाकार घेत प्रारंभी मोठ्या प्रमाणावर तक्रारी असलेल्या व्यवस्थापकाची उचलबांगडी केली आणि त्याठिकाणी प्रकाश साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. याशिवाय कालिदासमधील व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यासाठी सहायक आयुक्त वसुधा कुरणावळ यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. दरम्यान, अनेक किरकोळ सुधारणा केल्यानंतर चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात खुर्च्या, रंगरंगोटीसाठी सुमारे ६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अद्याप प्रशासनाकडे महासभेचे अंदाजपत्रक आले नसल्याने सदर काम रखडले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून कालिदासमध्ये असलेल्या तिकीट खिडकीचाही वाद संपुष्टात येणार आहे. कालिदास कलामंदिरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यालयाच्या जागेतच तिकीट खिडकी आहे. सदर खिडकी हलवून ती काही वर्षांपूर्वी कालिदासच्या प्रवेशद्वाराजवळ बांधण्यात आली. परंतु सदर जागेत नाट्यव्यावसायिकांनी जाण्यास नकार दिला.
सदर जागा योग्य नसल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. परंतु, व्यावसायिकांच्या तालावर न नाचता महापालिका प्रशासनाने सदर खिडकी आता प्रवेशद्वाराजवळ नेण्याची तयारी सुरू केली असून, सदर जागेची साफसफाई करून जानेवारीपासून खिडकी नव्या जागेत हलविली जाणार आहे. कॉँग्रेसचे गटनेते तथा नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे उपाध्यक्ष शाहू खैरे यांनीही सदर खिडकी स्थलांतर करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kalidas Kalamandir ticket window entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.