कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पैठणे यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 12:36 AM2021-08-21T00:36:58+5:302021-08-21T00:37:17+5:30

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार नाशिक येथील वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांना जाहीर करण्यात आला आहे.

Kalidas Sanskrit Sadhana Award announced to Paithane | कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पैठणे यांना जाहीर

कालिदास संस्कृत साधना पुरस्कार पैठणे यांना जाहीर

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार नाशिक येथील वेदमूर्ती रवींद्र पैठणे यांना जाहीर करण्यात आला आहे.

दरवर्षी संस्कृत व वैदिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. २०१९ या वर्षाकरिताचा पुरस्कार नाशिक मधील वैदिक विद्वान वेदमूर्ती तसेच महर्षी गौतम गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानचे संस्थापक प्रधान आचार्य रवींद्र दत्तात्रय पैठणे यांना देण्यात येणार आहे. पंचवीस हजार रुपये रोख, मानपत्र तसेच शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या २८ ऑगस्ट रोजी नागपूरमधील रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय या प्रांगणात हा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे.
पैठणे हे अतिशय कमी वयामध्ये वैदिक क्षेत्रांत वेद विद्येच्या संरक्षण संवर्धन प्रचार-प्रसाराचे कार्य गेली अनेक वर्ष अव्याहतपणे ते करीत आहेत. अखिल भारतीय वैदिक संमेलन पुणे, दिल्ली, कोलकाता, नाशिक, बडोदा, औरंगाबाद आदी ठिकाणी संमेलनात सहभाग घेतला आहे.

Web Title: Kalidas Sanskrit Sadhana Award announced to Paithane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक