राष्टÑवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 11:47 PM2018-09-07T23:47:36+5:302018-09-08T00:55:37+5:30

महापालिकेने महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाच्या वाढविलेल्या भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. ७) महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाबाहेर प्रतीकात्मक नोटीस लावत आंदोलन केले.

Kalidas satirical notices of the Nation-Plaintiff Congress | राष्टÑवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

राष्टÑवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

Next
ठळक मुद्देभाडेवाढीला विरोध : नाट्यगृहासमोर ठिय्या आंदोलन

नाशिक : महापालिकेने महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाच्या वाढविलेल्या भाडेवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी (दि. ७) महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाबाहेर प्रतीकात्मक नोटीस लावत आंदोलन केले.
या संदर्भात लावण्यात आलेल्या उपहासात्मक नोटिसीत नमूद केले आहे की, ‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते की, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंढे यांची खासगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. नाशिककरांच्या कलारसिकतेला व भावनेला येथे काही थारा नाही. पैशाशिवाय प्रवेश केल्यास घरपट्टीत चारपट वाढ करण्यात येईल’ ही नोटीस प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
कालिदासच्या भाडेवाढीमुळे नाटकांच्या तिकीट दरामध्येही वाढ होईल व ते प्रेक्षकांना परवडणार नाही. त्यामुळे कलावंत कमी दरातील नाट्यगृहाकडे वळतील व कालिदास कलामंदिर भाडेवाढीमुळे दुर्लक्षित होईल. परिणामी महापालिकेच्या नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चावर पाणी फिरेल, अशी भीती दिलीप खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, मुख्तार शेख, अंबादास खैरे, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, कविताताई कर्डक, संजय खैरनार, धनंजय निकाळे, चिन्मय गाढे, प्रफुल्ल पाटील, सुरेखा निमसे, पूनम शहा, शंकर मोकळ आदी उपस्थित होते.

Web Title: Kalidas satirical notices of the Nation-Plaintiff Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.