राष्ट्रवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

By श्याम बागुल | Published: September 7, 2018 03:44 PM2018-09-07T15:44:36+5:302018-09-07T15:47:37+5:30

‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते कि, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंडे यांची खाजगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील.

Kalidasan's satirical notice of Nationalist Congress | राष्ट्रवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

राष्ट्रवादी कॉँग्रेसची कालिदासला उपहासात्मक नोटीस

Next
ठळक मुद्देभाडेवाढीला विरोध : नाट्यगृहासमोर ठिय्या आंदोलनभाडेवाढीमुळे नाटकांच्या तिकीट दरामध्येही वाढ होईल

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाचे नाशिक महापालिकेने वाढविलेल्या भाडेवाढविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शुक्रवारी महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहाबाहेर प्रतिकात्मक नोटीस लावत आंदोलन केले.
या संदर्भात लावण्यात आलेल्या उपहासात्मक नोटीसीत नमूद केले आहे की, ‘महापालिका हद्दीतील नाट्यप्रेमी, कलावंत व कलारसिकांना सूचित करण्यात येते कि, महाकवी कालिदास कलामंदिर ही आयुक्त मुंडे यांची खाजगी मिळकत आहे. सदर मिळकतीत प्रवेश करावयाचा असल्यास प्रचंड पैसे खर्च करावे लागतील. नाशिककरांच्या कलारसीकतेला व भावनेला येथे काही थारा नाही. पैशाशिवाय प्रवेश केल्यास घरपट्टीत चारपट वाढ करण्यात येईल’ ही नोटीस प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे.
कालिदासच्या भाडेवाढीमुळे नाटकांच्या तिकीट दरामध्येही वाढ होईल व ते प्रेक्षकांना परवडणार नाही. त्यामुळे कलावंत कमी दरातील नाट्यगृहाकडे वळतील व कालिदास कलामंदिर भाडेवाढीमुळे दुर्लक्षित होईल. परिणामी महापालिकेने नूतनीकरणासाठी केलेल्या खर्चावर पाणी फिरेल, अशी भीती प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांनी यावेळी व्यक्त केली. या आंदोलनात बाळासाहेब कर्डक, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गजानन शेलार, मुख्तार शेख, अंबादास खैरे, अनिता भामरे, सुषमा पगारे, समीना मेमन, कविताताई कर्डक, संजय खैरनार, धनंजय निकाळे, चिन्मय गाढे, प्रफुल्ल पाटील, सुरेखा निमसे, पूनम शहा, शंकर मोकळ आदी उपस्थित होते.

Web Title: Kalidasan's satirical notice of Nationalist Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.