कालिका मंदिर भाविकांसाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:15 AM2021-04-08T04:15:21+5:302021-04-08T04:15:21+5:30
कोरोनाच्या काळातही बहुतांशी भाविक शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत पुढील आठवड्यात म्हणजे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला प्रारंभ होणार आहे. ...
कोरोनाच्या काळातही बहुतांशी भाविक शासनाच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत पुढील आठवड्यात म्हणजे गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाला प्रारंभ होणार आहे. यादिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आसल्याने मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिर बंदच्या काळात देवीची दैनंदिन आणि नित्यपुजा काकड आरती, धूपारती, महाआरती अशा दैनंदिन पूजा केवळ मोजक्याच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. साथीच्या आजाराची गंभीरता विचारात घेता भाविकांची श्री कालिकादेवीवरील नितांत असलेल्या श्रद्धेइतकीच त्यांच्या जीविताची काळजी घेणे या उद्देशाने मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाच्या आदेशानुसार घेतला आहे. भाविकांनी योग्य ती खबरदारी घेऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिर संस्थानचे सरचिटणीस डॉ प्रतापराव कोठावळे कोषाध्यक्ष सुभाष तळाजीया, किशोर कोठावळे, संतोष कोठावळे, विशाल पवार, योगेश पवार आदींनी केले आहे.
(फोटो ०७ कालीका)