मराठी निवेदनाच्या जागतिक स्पर्धेत नाशिकच्या कल्पेशची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:42+5:302021-06-04T04:12:42+5:30
नाशिक : ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या वचनानुसार चांगला वक्ता हा दहा हजारांत एक तर वक्तृत्वाच्या अंगाला निवेदनाची जोड ही तर ...
नाशिक : ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या वचनानुसार चांगला वक्ता हा दहा हजारांत एक तर वक्तृत्वाच्या अंगाला निवेदनाची जोड ही तर पासष्टावी कला मानली जाते. प्रख्यात गायक अरुण दाते यांचे सुपुत्र अतुल दाते यांनी अरुण दाते कला अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या मराठी निवेदनाच्या जागतिक ऑनलाइन स्पर्धेत नाशिकच्या कल्पेश कुलकर्णी यांनी अव्वल स्थानासह बाजी मारली.
माणिक एन्टरटेन्मेंट या संस्थेने आयोजित केलेल्या बोलू ऐसे बोल या स्पर्धेत जगभरातील २२३ निवेदकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत तीन फेऱ्या घेण्यात आल्या. तिन्ही विषय विभिन्न असल्याने त्यासाठी स्पर्धकांनी स्वतंत्र विचार करून भिन्न अंगांनी त्यांचे स्क्रिप्ट सादर केले. पहिल्या फेरीसाठी कुठल्याही गाण्याचा जन्म तर दुसऱ्या फेरीसाठी गीतातील कविता या प्रकारे २२३ मधून ३६ दुसऱ्या फेरीत तर ३६ पैकी १७ निवेदकांना अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. त्यातून नाशिकच्या कल्पेश कुलकर्णी, नवी मुंबईच्या जान्हवी खराळकर, पुण्याच्या डॉ. विनया केसकर यांना विजेते म्हणून घोषित करण्यात आले. भारतासह जगातील विविध देशांमध्ये पसरलेल्या मराठी कुटुंबांतीय युवकांनीदेखील सहभाग नोंदवलेल्या स्पर्धेत मिळालेल्या विजेतेपदाबद्दल कल्पेश याचे विविध मान्यवरांनी कौतुक केले.
कोट
मोठ्या व्यासपीठावरील सन्मानाचा आनंद
नाट्यक्षेत्रात काम करण्यासह काही लहान-मोठ्या कार्यक्रमात निवेदनाचा अनुभव होता. मात्र, वैश्विक स्तरावर झालेल्या मराठीच्या पहिल्याच निवेदन स्पर्धेत थेट विजेतेपदापर्यंत पोहोचू शकेन, असे वाटले नव्हते. मात्र, स्पर्धेसाठीच्या तिन्ही फेऱ्यांमध्ये प्रचंड मेहनत घेऊन केलेले सादरीकरण प्रभावी ठरल्याचा आनंद आहे. विशेषत्वे वैश्विक स्तरावरील व्यासपीठावर मिळालेले विजेतेपद आणि सन्मानाने खूप आनंद झाला आहे.
कल्पेश कुलकर्णी, विजेता
फोटो
०३कल्पेश कुलकर्णी