‘वीकेण्ड’ला कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:25+5:302021-07-02T04:11:25+5:30

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा ...

Kalsubai-Harishchandragad Sanctuary closed on 'Weekend' | ‘वीकेण्ड’ला कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य बंद

‘वीकेण्ड’ला कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य बंद

Next

राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहे. दरम्यान, डेल्टा प्लसचा शिरकाव गावपातळीवर होऊ नये, यासाठी नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकीय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बैठक घेतली. यावेळी गावकऱ्यांसोबत झालेल्या चर्चेतून शनिवार, रविवारी पर्यटकांना मज्जाव करण्याच्या निर्णयावर सर्वांनी शिक्कामाेर्तब केल्याचे रणदिवे यांनी सांगितले. याप्रसंगी भंडारदरा वनक्षेत्रपाल अमोल आडे, राजूरचे वनक्षेत्रपाल दत्तात्रट पडवळे, वनपाल रवींद्र सोनार यांच्यासह पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याची चिन्हे दिसत असताना नाशिक वनवृत्तामधील कळसूबाई-हरिश्चंद्रगड, नांदूर-मध्यमेश्वर, जळगावचे यावल आणि धुळे येथील अनेर डॅम अभयारण्यांच्या वाटा ८जून रोजी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या होत्या.

--इन्फो--

महिनाभरापूर्वीच अभयारण्य पर्यटनावर निर्बंध

जेमतेम महिना होत नाही तोच या कोरोनाच्या डेल्टा या उत्परिवर्तित विषाणूने डोके वर काढले आहे. या विषाणूने वातावरणात टिकाव धरण्यासाठी पुढची पायरी गाठली असून, डेल्टा प्लस असे त्याला नाव देण्यात आले आहे. महिनाभरात कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील पर्यटनावर निर्बंध घालण्याची वेळ ओढावली आहे.

---इन्फो--

पर्यटकांची होणार ॲन्टिजन चाचणी

वन्यजीव विभागाकडून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांची शेंडी, मुतखेल या दोन नाक्यांवर प्रवेशापूर्वी कोरोनाची रॅपिड ॲन्टिजन चाचणी करण्यात येणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग, ऑक्सिजन सॅच्युरेशन तपासूनच प्रवेश दिला जाणार आहे, याबाबत नाक्यावरील वन कर्मचारी, वन ग्राम समितीचे स्वयंसेवक यांना माहितीवजा प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने ॲन्टिजन चाचणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी सांगितले.

--इन्फो--

या पर्यटनस्थळांवर मज्जाव

अभयारण्य परिसरातील रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर, साम्रदची सांदण व्हॅली, रतनगड, कळसूबाई शिखर, हरिश्चंद्रगड, नेकलेस वॉटरफॉल, न्हाणी वॉटरफॉल, कुमशेतचा परिसर, इकोसिटी घाटघर, पांजरे वॉटरफॉल आदी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना वीकेण्डला जाता येणार नाही.

010721\01nsk_21_01072021_13.jpg~010721\01nsk_22_01072021_13.jpg

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर बंद ~कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य परिसर बंद 

Web Title: Kalsubai-Harishchandragad Sanctuary closed on 'Weekend'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.