कळसुबाई मित्र मंडळाकडून रॅपलिंगद्वारे लिंगाणा किल्ला सर, सामूहिक स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:18 PM2017-12-27T13:18:09+5:302017-12-27T13:19:12+5:30
घोटी- राज्यातील गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी गेली अनेक वर्षांपासून निस्पृहपणे काम करणाºया घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाच्या सदस्यानी सरत्या वर्षाला अनोख्या पद्धतीने निरोप दिला.या ग्रुपमधील सदस्यांनी राज्यात चढाईसाठी अंत्यत खडतर आणि अवघड समजला जाणारा रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला रॅपलिंगच्याद्वारे सर करीत एक आदर्श निर्माण केला आहे.

घोटीतील कळसुबाई मित्र मंडळाची भगीरथ मराडे यांनी स्थापना केल्यानंतर हे मंडळ गेली अनेक वर्षांपासून गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करीत आहे.या मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत तसेच पर्यावरणाच्या रक्षणार्थ गड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविली आहे.
या मंडळाने सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी राज्यात चढाईसाठी सर्वात अवघड आणि खडतर समजला जाणारा रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ला रॅपलिंगच्या दोरीच्या सहाय्याने चढण्याचा निर्धार केला.यानुसार या मंडळाचे भगीरथ मराडे, बाळू राधाकिसन आरोटे, अशोक हेमके, प्रशांत येवलेकर, प्रशांत जाधव, बालाजी तुंबारे, संतोष म्हसणे, लकी राका, प्रवीण भटाटे, गजानन चव्हाण आदींनी हा किल्ला तब्बल बारा तासाहून अधिक काळ रॅपलिंग करीत पादाक्र ांत केला.दरम्यान या युवकांनी यावरच न थांबता किल्ला परिसराची स्वच्छता केली.या उपक्र माचे राज्यातील पर्यटक, इतिहासकार यांच्याकडून कौतुक होत आहे.
--------------
राज्यातील सर्वात अवघड आणि खडतर समजला जाणारा लिंगाणा किल्ला सर करणे हे आमच्यासाठी एक आव्हान होते. मात्र मंडळाच्या सर्व सदस्याचा नियमित सराव असल्याने हे आव्हान आम्ही समर्थपणे पेलले. अनोळखी वाट, रात्रीचा अंधार यात रॅपलिंग करणे हा एक थरार होता.
-भगीरथ मराडे, संस्थापक अध्यक्ष, कळसुबाई मित्र मंडळ