पर्यावरण रक्षणार्थ कळसूबाई शिखराची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:45 PM2017-09-27T23:45:49+5:302017-09-28T00:08:19+5:30

तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे.

 Kalsubai peak cleanliness for environmental protection | पर्यावरण रक्षणार्थ कळसूबाई शिखराची स्वच्छता

पर्यावरण रक्षणार्थ कळसूबाई शिखराची स्वच्छता

googlenewsNext

सुनील शिंदे।
इगतपुरी : तालुक्यातील कळसूबाई मित्रमंडळाच्या सदस्यांनी गेल्या २१ वर्षांपासून नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखर सर करण्याचा निर्धार अखंडितपणे या वर्षी कायम ठेवला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नवरात्र उत्सवाबरोबरच इतर प्रासंगिक महोत्सवाचे औचित्य साधत गेल्या २१ वर्षांत २५१ वेळा शिखर सर करण्याचा विक्रम भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या युवकांनी केला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवात पर्यावरणाच्या रक्षणार्थ हे युवक शिखरावर स्वच्छता मोहीम राबवित आहे.  गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा वसा घेऊन गेल्या २१ वर्षांपासून या कार्यात झोकून देणाºया युवकांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाची ख्याती राज्यभर पसरली आहे. पर्यावरण, आरोग्य, स्वच्छता, वृक्षारोपणासह एकात्मतेचा संदेश देणारे हे युवक तालुकाभर कौतुकास्पद कामिगरी करीत आहेत.
शिखरावर घटस्थापना करून पहिल्या माळेपासून स्वच्छतेला सुरुवात केली. या कार्यात सहभागी झालेले कळसूबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे, सोमनाथ भगत, अशोक हेमके, बाळू आरोटे, प्रशांत जाधव, गजानन चव्हाण, नीलेश आंबेकर, बालाजी तुंबारे, प्रवीण भटाटे, शिवा जाधव, देवीदास पाखरे, किसन दराणे, उमेश रावळ, पंढरीनाथ दुर्गुडे, ज्ञानेश्वर मांडे, संतोष म्हसणे, रमेश हेमके, नितीन भागवत, सोनू गिते, श्रवण सोपे, गोरख लगडे, जालिंदर घाणे, निवृत्ती खाडे, गोरख डगळे, कैलास धिंदळे, लोहरे सर, चेतन छत्रे, शिवदास जोशी, भगवान तोकडे, किसन दराणे सर व इतर देवीभक्त सहभागी झाले आहेत. मराडे यांनी नवरात्र काळात नऊ दिवस कळसूबाई दर्शनाला जाण्याची कल्पना सहकाºयांपुढे मांडली. या कल्पनेस मित्रांनीही सकारात्मक प्रतिसाद देत नवरात्रीतील नऊ दिवस कळसूबाईच्या दर्शनाला जाण्याची तयारी दर्शवली. सहकार्यांच्या मदतीने कळसूबाई शिखरावर नवरात्रोत्सवात स्वच्छता मोहीम यशस्वी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.  मंडळातकोणतीही यात्रा,उत्सव धार्मिक कार्यक्र म सार्वजनिक कार्यकम हे संपन्न झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येतो.हा कचरा पर्यावरणास हानिकारक असल्याने पर्यावरणाचा र्हास होतो.राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाई मातेच्या भक्तीच्या ओढीमुळे शिखर सर करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या या उपक्र मातच मंदिर परिसर व शिखराचे पावित्र्य राखण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिमेस या वर्षीही युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,यापुढेही हा उपक्र म कायम चालू राहील. - भगीरथ मराडे, संस्थापकीय अध्यक्ष,कळसुबाई मित्र मंडळ


 

Web Title:  Kalsubai peak cleanliness for environmental protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.