कळवण बाजार समिती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 11:15 PM2020-03-25T23:15:09+5:302020-03-25T23:15:40+5:30
मार्च २०२० आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करणे व राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव दि. ३ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली आहे.
कळवण : मार्च २०२० आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करणे व राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव दि. ३ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी दिली आहे.
देशासह महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. वेगवेगळ्या कारणाने नागरिक गर्दी करीत आहेत. शासनाने जमावबंदी कायदा लागू करूनही व वर्क फ्रॉम होम, नागरिक घरीच राहण्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे याचे गंभीर परिणाम आगामी काळात होणार आहेत तसेच राज्यात संचारबंदी लागू झाल्याने मजूर मिळणार नसल्याने व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडे व्यवहार बंद ठेवण्यासाठी विनंती अर्ज केला होता. बाजार समितीमध्ये सध्या गावठी कांद्याची मोठी आवक वाढल्याने शेतकºयांची गर्दी वाढली आहे. गर्दी रोखण्यासाठी व शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा व भुसार मालाचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकºयांनी शासनाचे पुढील निर्देश प्राप्त होईपर्यंत कांदा व भुसार माल विक्र ीस आणू नये, असे आवाहन पवार व हिरे यांनी केले आहे.