कळवण नगरपंचायतीकडे पाच लाखांची वसुली

By admin | Published: November 13, 2016 11:57 PM2016-11-13T23:57:39+5:302016-11-14T00:02:26+5:30

नोटांचा तुटवडा : सप्तशृंगगडावर भाविकांना मोफत अन्नदान

Kalvan Nagar Panchayat gets recovery of five lakhs | कळवण नगरपंचायतीकडे पाच लाखांची वसुली

कळवण नगरपंचायतीकडे पाच लाखांची वसुली

Next

कळवण : येथील नगरपंचायत कार्यालय रद्द झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचा सोमवारपर्यंत ( दि. १४) स्वीकार करणार असून, त्यातून नगरपंचायतीची कोणतीही देणी भरू शकता येणार असल्याने नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद उत्तम प्रतिसाद मिळला असून, आजअखेर कळवण नगरपंचायतीमध्ये विविध करापोटो पाच लाख रुपयांचा भरणा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पाणी, वीज, मालमत्ता कर यासह इतर शासकीय देयकांचा भरणा करताना ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या चलनी नोटा दि. १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्याची परवानगी केंद्र शासनाने राज्य शासनाला दिली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जुन्या चलनी नोटांच्या स्वरूपात नागरिकांकडून करांचा भरणा स्वीकारण्यास अनुमती दिल्याने दि. ११ ते १३ नोव्हेंबरअखेर नगरपंचायत कार्यालयात नागरिकांनी संपर्क साधून या संधीचा लाभ घेतला आहे. कळवणकरांनी आपले कर जुन्या चलनी नोटांच्या स्वरु पात भरावे, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने आज अखेर पाच लाख रुपयांचा भरणा झाला आहे. याबाबत सोशल मीडिया व शहरातील विविध भागात रिक्षा फिरवून लाउड स्पीकरच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले होते.
महानगरपालिका व नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा जुन्या चलनात रोखीने करण्यासाठी शासनाच्या नगरविकास विभागाने अनुमती दिल्याने १४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्या स्वीकारल्या जाणार आहे. ५०० व १०००
रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात होणारा भरणा हा ना परतावा असणार आहे.
नागरिकांना विविध करांचा भरणा करता यावा यासाठी कळवण नगरपंचायतने आवश्यक प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपले कर जुन्या चलनात भरावेत, असे आवाहन कळवण नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. पटेल यांनी केले आहे.
ग्रामपंचायतच्या या निर्णयामुळे घरपट्टी, पाणीपट्टीची थकबाकी भरण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली असून, नागरिकांची अडवणूक न करता कर्मचाऱ्यांनी सौजन्याचे धोरण स्वीकारले आहे. सर्वत्र आर्थिक व्यवहार थंडावलेले असताना कळवण नगरपंचायतच्या तिजोरीत मात्र तासागणिक भर पडत आहे. (वार्ताहर)

Web Title: Kalvan Nagar Panchayat gets recovery of five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.