कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:34 AM2018-02-07T00:34:32+5:302018-02-07T00:34:59+5:30

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे.

Kalvan: The protest against Chatana water channel in Gram Sabha in 40 villages | कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

कळवण : तालुक्यातील ४० गावांच्या शेतकºयांचा ग्रामसभेत ठराव सटाणा जलवाहिनीस तीव्र विरोध

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीप्रश्न पेटण्याची चिन्हेजलवाहिनी योजना मंजूर

कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा शहरातील जनतेला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचा विरोध नाही. जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला आमचा विरोध आहे, त्यामुळे जलवाहिनीद्वारे पाणी बाहेर जाऊ देणार नाही, अशी भूमिका कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांनी घेतली आहे. या विषयी कळवण तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसभेत पुनंद प्रकल्पातून जलवाहिनी जाऊ देण्यास विरोध असल्याचा ठराव करण्यात आल्याने सटाण्याचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी याप्रश्नी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे. कळवण तालुक्यातील पुनंद प्रकल्पातून सटाणा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने ५५ कोटी रुपयांची जलवाहिनी योजना मंजूर करून प्रशासकीय मान्यता दिली आहे. या योजनेला कळवण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस व कॉँग्रेसने विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादीचे नेते, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी पुनंद प्रकल्पांतर्गत येणाºया कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या गाठीभेटी घेऊन या योजनेला विरोध दर्शवण्याची भूमिका भूमिका स्पष्ट केली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रजासत्ताकदिनी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल त्या सभेत सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीद्वारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध दर्शविणारे ठराव करण्याचे आवाहन केले होते. २६ जानेवारीच्या ग्रामसभांवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकल्याने तालुक्यात अन्य दिवशी ग्रामसभा घेण्यात येऊन जलवाहिनीला विरोध असल्याचे ठराव करण्यात आले. यात सुपले दिगर, काठरे दिगर, शेरी, भैताणे, निमपाडा, जयदर, सुळे, सावरपाडा, पिंपळे, चाफापाडा, दह्याणे, हुंड्यामोख, उंबरेबन, पिंपळे खुर्द, गणोरे, पाडगण, नाळीद, भांडणे, इन्शी, देसराणे, रवळजी, कोकणीपाडा, मोकभणगी, दरेभणगी, ककाणे, खेडगाव, नाकोडे, पाटविहीर, विसापूर, बिजोरे, नवी बेज, जुनी बेज, भादवण, गांगवण, बगडू, चाचेर, धनगरपाडा, पिळकोस, खामखेडा, सावकी परिसरातील ४० गावे व वाड्या-वस्त्यांवरील शेतकरी बांधवांनी विरोध दर्शविला आहे.
तालुक्यात साकारलेल्या अर्जुनसागर (पुनंद) या जलप्रकल्पामध्ये असलेल्या पाण्यावर तालुक्यातील शेतकरी बांधवांचा व जनतेचा प्रथम हक्क असल्याने तालुक्यातील पाणी बाहेर जाऊ देण्यास शेतकरी बांधवांनी व जनतेने ग्रामसभांमधून कडाडून विरोध केल्याने व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना निवेदनाची प्रत पाठवून या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे. यामुळे सटाणा नगरपालिकेची जलवाहिनी योजना संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्जुनसागर (पुनंद )प्रकल्प व त्याअंतर्गत असलेल्या सुळे उजवा व डावा कालवा तसेच सुपले उजवा व डावा कालवा व पोटचारीसाठी शेतकरी बांधवांच्या शेतजमिनी हातच्या गेल्या असून त्याचा मोबदला अजूनही पदरात पडलेला नाही. कालवा लाभक्षेत्रातील शेतकरी तहानलेला असताना सटाणा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता देऊन कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवावर अन्याय केला आहे, अशी भावना कळवण तालुक्यातील जनतेतून निर्माण होत आहे.

Web Title: Kalvan: The protest against Chatana water channel in Gram Sabha in 40 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी