कळवण आदीवासी तालुक्यात पेसासह अन्य निधीला फुटले पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 05:12 PM2018-10-07T17:12:54+5:302018-10-07T17:17:26+5:30
कळवण : कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाने पेसा अंतर्गत आलेल्या लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली असून निवेदनातील तक्र ारीची सखोल चौकशी करु न अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
कळवण : कळवण तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाने पेसा अंतर्गत आलेल्या लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिषदेने नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्याकडे केली असून निवेदनातील तक्र ारीची सखोल चौकशी करु न अपहार प्रकरणी ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान कळवण पंचायत समितीचे गटविकासधिकारी डी. एम. बहीरम यांच्याकडे संघर्ष परिपदेने तक्र ार केल्यानंतर मळगाव खुर्द ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची चौकशी व बॅँॅक खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
मळगाव खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवकाने मनमानी कारभार करुन त्यातून गैरव्यवहार करताना बोगस प्रोसेडीग तयार करणे, सन २०१४ ते २०१८ या चार आर्थिक वर्षात पेसा अंतर्गत ग्रामपंचायतला किती निधी आला याबाबत ग्रामसभेला अंधारात ठेवणे, पेसा निधीचा पैसा कुठल्या विकासकामांसाठी खर्च केला याची माहिती न देणे, ग्रामनिधी खर्चाची माहीती दडवून ठेवणे या प्रकारे मनमानी कारभार करु न लाखो रु पयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने केली आहे. केंद्र सरकारने मळगाव खुर्द ग्रामपंचायतला दरवर्षी ६ लाख ८५ हजार रु पयांचा निधी ग्रामकोष समीतीच्या खात्यावर वर्ग केला असून चार वर्षात मळगाव खुर्द ग्रामपंचायतला २७ लाख ४० हजार रु पयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र त्या निधीतून गावात विकासकामे झाल्याचे दिसत नसून निधीची परस्पर विल्हेवाट लावली असल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने केली आहे.
ग्रामपंचायतचे खाते बंद करण्याचे आदेश-
ग्रामसभेला अंधारात ठेऊन पेसासह अन्य शासकीय योजनांसाठी मळगाव खुर्द या आदीवासी गावासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आलेल्या निधीची विल्हेवाट लावून विचारणा केली असता मळगाव खुर्द ग्रामस्थांना धमकाविल्याची तक्र ार आदीवासी संघर्ष परिपदेने कळवण पंचायत समितीचे गटविकासाधिकारी डी. एम. बहीरम यांच्याकडे केली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांच्याकडे निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची कारवाई व दखल न घेतल्यामुळे आदीवासी संघर्ष परिपदेने पंचायत समितीचे गटविकासाधिकारी बहीरम यांची भेट घेऊन निवेदन दिल्याने त्यांनी ग्रामसेवकाच्या कारभाराची चौकशी करण्यासह ग्रामसभेचा पुढील आदेश होईपर्यंत ग्रामपंचायतींचे सर्व बॅक खाते बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
अक्षर ओळख नाही अन आॅनलाईन पहा-
अक्षर ओळखही नसलेल्या आदिवासी ग्रामस्थांना पेसासह अन्य निधीचा तपशिल आनलाईन पाहण्याचा सल्ला ग्रामसेवकांकडून दिला जातो. असा प्रकार कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द ग्रामपंचायतच्या ग्राम सेवकाच्या मनमानीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.