कळवणकरांचा घनकचऱ्याचा प्रश्न मिटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:11 AM2021-06-05T04:11:14+5:302021-06-05T04:11:14+5:30
या प्रकल्पाच्या माध्यमातून गॅस, खत आणि रोजगार कळवणकरांना उपलब्ध होणार असल्याने राज्यातल्या १२६ नगरपंचायतींसाठी हा प्रकल्प दिशादर्शक ...
या प्रकल्पाच्या माध्यमातून गॅस, खत आणि रोजगार कळवणकरांना उपलब्ध होणार असल्याने राज्यातल्या १२६ नगरपंचायतींसाठी हा प्रकल्प दिशादर्शक ठरणार आहे.
कळवण शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढता विस्तार यामुळे दैनंदिन कचरा निर्मूलनाचा मोठा प्रश्न होता. सध्या हा कचरा शनिमंदिरालगत असलेल्या बेहडी नदीपात्रात टाकला जात होता. याठिकाणी सुमारे ७५ हजार टन कचरा पडलेला आहे. त्या ठिकाणी या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कचऱ्याचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येऊन त्यावर प्रक्रिया केली जात आहे. याद्वारे तयार झालेले खत शेतकऱ्यांना अल्पदरात उपलब्ध झाले आहे. प्लॅस्टिक व काच यावर प्रक्रिया करून ते मालेगाव येथील व्यापाऱ्यांना दिल्यामुळे शहरातील कचऱ्याची मोठी समस्या मिटली आहे.
घनकचरा व्यवस्थापनाच्या पहिल्या टप्प्यात पाच टन बायोगॅस योजना कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा शासन स्तरावर प्रस्ताव सादर केला आहे. दुसऱ्या टप्प्यात खासगी तत्त्वावर प्रत्यक्ष गॅसनिर्मिती करून व्यावसायिकांना हा गॅस उपलब्ध करून दिला जाणार असून, बायोगॅसपासून मिथेन वेगळा केल्यानंतर मिळणाऱ्या सीएनजीसारखे इंधन सिलिंडर्समधून घरी अथवा हॉटेल्समध्ये पुरवण्यात येणार आहे.
इन्फो
कळवणची लोकसंख्या- २०,५००
एकूण घरे- ५,०००
संकलित होणारा कचरा - ७ टन
घंटागाड्या - ८
संभाव्य रोजगार - २० कामगार
इन्फो
कळवणकर नागरिकांनी आपल्या घरापुढे येणाऱ्या घंटागाडीत ओला कचरा व सुका कचरा हा स्वतंत्रपणे वर्गीकरण करून टाकला, तर घनकचरा व्यवस्थापनासाठी ते सोयीस्कर ठरणार आहे. नागरिकांनी कचऱ्याचे वर्गीकरण योग्य पद्धतीने करण्यासाठी सहकार्य करावे.
- डॉ. सचिन पटेल,
मुख्याधिकारी, कळवण नगरपंचायत
कोट....
घनकचरा व्यवस्थापन हा प्रश्न फक्त सामाजिक नसून सामाजिक, तांत्रिक व आर्थिक व्यवस्थापनाशी निगडित असल्यामुळे नागरिकांमध्ये व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागरूकता निर्माण होऊन सुयोग्य तंत्रज्ञानाच्या माध्यमातून घनकचऱ्याचे व्यवस्थापन शक्य होणार आहे.
- किरण पटवर्धन,
तांत्रिक सल्लागार
फोटो- ०४ कळवण बायोगॅस
===Photopath===
040621\04nsk_13_04062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०४ कळवण बायोगॅस