कळवण : तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे दोन कोटी ५० लाखांची वीजबिल थकबाकी १३३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:09 AM2018-02-05T00:09:20+5:302018-02-05T00:11:12+5:30

कळवण : वीज कंपनीकडून तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींअंतर्गत १३३ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा व ग्रामपंचायतचा वीजपुरवठा खंडित करण्याचा कळवण उपविभागाने घेतला आहे.

Kalwan: Power supply of 133 water supply schemes to the gram panchayat in Teluk | कळवण : तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे दोन कोटी ५० लाखांची वीजबिल थकबाकी १३३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

कळवण : तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे दोन कोटी ५० लाखांची वीजबिल थकबाकी १३३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देपिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण ग्रामपंचायत खात्यात थेट पैसा

कळवण : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून ग्रामपंचायतींना वेळोवेळी नोटिसा व पत्रव्यवहार, विचारणा करूनसुद्धा वीजबिलाचा भरणा करण्यात आला नसल्याने कळवण तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींअंतर्गत असलेल्या १३३ गावांच्या पाणीपुरवठा योजनांचा व ग्रामपंचायतचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीच्या कळवण उपविभागाने घेतला आहे. त्यामुळे कळवण तालुक्यातील या १३३ पाणीपुरवठा योजनेवरील ग्रामस्थ व महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, आदिवासी महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. कळवण तालुका आदिवासी उपयोजनेत असल्याने तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींना पेसा अंतर्गत चौदाव्या वित्त आयोगासह केंद्र व राज्य सरकारकडून ग्रामपंचायत खात्यात थेट पैसा येतो. विकासकामांअभावी पैसा ग्रामपंचायत खात्यात शिल्लक आहे. परंतु जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून योग्य मार्गदर्शन नसल्याने पैसा असूनही वीजबिल थकबाकीचा पैसा भरत येत नसल्याने पाणीपुरवठा योजना बंद आहेत. तालुक्यातील या गावांच्या सरपंच व ग्रामसेवक यांना आदिवासी बांधवांच्या व भगिनींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींचे जिल्हा बॅँकेच्या शाखेत खाते आहे. जिल्हा बॅँकेची आर्थिक स्थिती राज्यभरातील सर्वच यंत्रणेला ज्ञात असल्याने या बॅँकेतील खातेदारांना पैसा असूनही अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याची झळ वीज वितरण कंपनीसह जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व पंचायत समिती व नोकरदार, सहकारी संस्था यांनासुद्धा बसली आहे.
विविध योजनांतर्गत खात्यात पैसे
पैसा असूनही ग्रामसेवकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरून योग्य मार्गदर्शन व सहकार्य मिळत नसल्याने तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती व निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेऊन तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने पूर्ववत करून सहकार्य करावे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी राज्य सरकारकडून मार्गदर्शन मागवून कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा वीज थकबाकीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. एका ग्रामपंचायतीकडे साधारण २ ते १० लाख रुपयांपर्यंतचे वीजबिल थकीत आहे. या ग्रामपंचायतींना चालू व थकबाकी बिल भरण्याची सक्ती वीज वितरण कंपनीने केली आहे. अनेक ग्रामपंचायतींनी चालू वीजबिल भरून आपली पत सांभाळली आहे; परंतु थकीत वीजबिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ग्रामपंचायतींकडे पैसाच नसल्याने थकीत बिल देण्यास टाळाटाळ होत आहे. ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे असलेली दोन कोटी ५० लाख रु पये थकबाकी वसूल करण्याचे वीज वितरण कंपनीच्या कळवण उपविभागीय कार्यालयाचे उद्दिष्ट असल्याने थकबाकी भरल्याशिवाय पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनी सुरळीत करणार नाही, अशी माहिती कळवण वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ऋषिकेश खैरनार यांनी दिली.
५० टक्क्यांपेक्षा कमी करवसुली
ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा निधी प्राप्त होतो. या निधीचा विकासासाठी उपयोग केला जातो. संबंधित विकासकामांवरच खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे सदर निधीचा उपयोग ग्रामपंचायत प्रशासन गावाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरू शकत नाही. जनतेकडून घरपट्टी व पाणीपट्टीच्या रूपात गोळा झालेला पैसा पाणीपुरवठा, पथदिव्यांचे वीजबिल भरणे, हातपंप दुरुस्ती करणे, गावातील गटारींची स्वच्छता राखणे आदी बाबींवर खर्च करता येतो. बहुतांश नागरिक पाणीपट्टी व घरपट्टीचा भरणा वेळेवर करत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत येते. तालुक्यातील आजही काही ग्रामपंचायतींची ५० टक्केपेक्षा कमी करवसुली झाली आहे. पैसे नसल्याने दैनंदिन खर्च कसा भागवावा असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर निर्माण होतो. नेहमीच बोटे मोडणारे नागरिक पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यास मात्र समोर येत नाही.

Web Title: Kalwan: Power supply of 133 water supply schemes to the gram panchayat in Teluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.