कमल गोला यांचा बारा ज्योतिर्लिंगाचा सायकल प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:24+5:302021-03-21T04:14:24+5:30

नाशिक : दिल्लीचे रहिवासी आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंट असलेले कमल गोला यांनी प्रारंभ केलेल्या सायकलवरून १२ ज्योतिर्लिंग दर्शनाअंतर्गत ते ...

Kamal Gola's cycle journey of twelve Jyotirlingas | कमल गोला यांचा बारा ज्योतिर्लिंगाचा सायकल प्रवास

कमल गोला यांचा बारा ज्योतिर्लिंगाचा सायकल प्रवास

Next

नाशिक : दिल्लीचे रहिवासी आणि व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंट असलेले कमल गोला यांनी प्रारंभ केलेल्या सायकलवरून १२ ज्योतिर्लिंग दर्शनाअंतर्गत ते नाशिक त्र्यंबकेश्वरला आले. चार महिन्यात त्यांनी ९ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केल्याबद्दल नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

बारा ज्योतिर्लिंग सायकल यात्रेस कमल यांनी ११ नोव्हेंबरला प्रारंभ केला होता. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट असलेले कमल गोला यांना परदेशात स्थायिक असताना सायकलची गोडी निर्माण झाली. आपला देश सायकलवर जवळून बघावा तसेच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आपला स्वतःचा फिटनेस व पर्यावरणाचा समतोल राखावा या अनुषंगाने त्यांनी १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन सायकलवर घेण्याचे ठरवले. दिल्ली-कलकत्ता- कन्याकुमारी-केरळ-कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र असा चार महिन्यात त्यांनी ९ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास पूर्ण केला आहे*. सहा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन, त्यांचे नाशिक नगरीत आगमन झाले. नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनच्यावतीने पारंपरिकरित्या औक्षण करून, शाल, टोपी घालून स्वागत करण्यात आले. तसेच त्यानिमित्ताने नाशिक सायकलिस्ट फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे ज्येष्ठ उपाध्यक्ष चंद्रकांत नाईक, सचिव डॉ. मनीषा रौंदळ, खजिनदार रवींद्र दुसाने, साधना दुसाने, डॉ. नितीन रौंदळ, राजेश्‍वर सूर्यवंशी हे उपस्थित होते. ते आज सकाळी त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला रवाना झाले. त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन ते भीमाशंकरकडे रवाना होणार आहेत.

फोटो

२० सायकलिस्ट

Web Title: Kamal Gola's cycle journey of twelve Jyotirlingas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.