कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 11:37 PM2017-07-27T23:37:48+5:302017-07-27T23:38:09+5:30
कनाशीत १६५१, तर अभोण्यात १६०१ रु पये दरकांद्याचा भाव वधारला
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कनाशी व अभोणा उपआवारात उन्हाळी कांद्याची आवक घटत चालल्याने कांद्याच्या बाजारभावात प्रतिक्विंटल चारशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली असून, गुरुवारी (दि. २७) उन्हाळी कांद्याला कनाशीत १६५१ रुपये, तर अभोणा उपआवारात सर्वाधिक १६०१ रुपये भाव मिळाला. कळवण मुख्य आवारात १४२० रुपये सर्वाधिक, तर सरासरी १३५० रु पये भाव राहीला.
कळवण बाजार समितीच्या कळवण (नाकोडे) मुख्य आवारात ३३८, कनाशी येथे ६९ व अभोण्यात ४५ वाहनातून १४ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आपला शेतमाल योग्य प्रतवारी करून बाजार समितीत तसेच अभोणा व कनाशी या उपबाजार समितीत विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती धनंजय पवार व सचिव रवींद्र हिरे यांनी केले.
कळवणसाठी एक कोटी ३८ लाख ५६ हजार रु पयांचे कांदा अनुदान कळवण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात गेल्या वर्षी (२०१६) जुलै व आॅगस्ट महिन्यात विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे अनुदान मंजूर झाले असून ३०५० कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल शंभर रु पये दरानुसार एक कोटी ३८ लाख ५६ हजार अनुदान शासनाने मंजूर केले असून, हे अनुदान लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी दिली.
शासनाने अनुदानाची सर्व रक्कम जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या बँक खात्यावर वर्ग केली असून लवकरच ती रक्कम संबंधित शेतकऱ््यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
यावेळी उपसभापती डी. एम. गायकवाड, संचालक मनोज शिंदे, सुनील देवरे, साहेबराव पाटील, हरिश्चंद्र पगार, सचिव रवींद्र हिरे आदी उपस्थित होते.कळवण तालुक्यात १२ लाख क्विंटल कांदा कळवण तालुक्यात कांदा लागवडीत वाढ होत असून, सन २०१६-१७ या वर्षीत साधारणपणे तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड करु न हेक्टरी २५० क्विंटल कांदा उत्पादन शेतकरी बांधवांनी काढले आहे. बाजार भावात सातत्याने होणारी घसरण लक्षात घेऊन कळवण या आदिवासी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी नेहमी कांदा साठवून करण्यावर भर दिला आहे. कळवण तालुक्यात ४३२७ कांदा चाळीमध्ये साधारणपणे १२ लाख क्विंटल कांदा साठविण्यात आला आहे. दररोज साधारण दोन ते तीन हजार क्विंटल कांदा पिंपळगाव बसवंत, वणी व उमराणे येथील बाजार समिती आवारात विक्र ीसाठी जाता.