कळवण तालुक्यातील कांदा युरोपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 10:25 PM2019-07-04T22:25:51+5:302019-07-04T22:26:21+5:30
कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात उत्पादित केलेला कांदा निर्यात सुविधा केंद्रामुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे.
कळवण : भेंडी येथे सर्वसोयी-सुविधांयुक्त आणि वातानुकूलित बांधण्यात आलेल्या कांदा, डाळींब, द्राक्ष शेतमाल निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली असल्याने या केंद्रातून आता थेट दुबई आणि युरोपमध्ये ३६० मेट्रिक टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. कळवण तालुक्यात उत्पादित केलेला कांदा निर्यात सुविधा केंद्रामुळे सातासमुद्रापार पोहोचला आहे.
गेल्या वर्षी हॉलंड येथील मेटा आणि लॅमी समा (लक्ष्मी) या दोन व्यापाऱ्यांनी निर्यात सुविधा केंद्राला भेट देऊन पाहणी करून कळवण तालुक्यातील द्राक्ष अमेरिका, युरोप, हॉलंड व इतर देशांत द्राक्षे, डाळिंब निर्यात करण्याचा मानस व्यक्त केला होता.कसमादे पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन केला जातो, कांद्याची साठवणूक करून त्याची निर्यात करण्याची सुविधा भेंडी येथील कांदा, द्राक्ष सुविधा केंद्रात आहे. मानूरचे भूमिपुत्र तत्कालीन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक सुनील पवार व कळवण येथील शेतकरी सहकारी संघाच्या पुढाकारातून महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ पुणे यांच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून सर्वसुविधांयुक्त निर्यात सुविधा केंद्र भेंडी येथे कार्यान्वित झाल्याने कसमादे पट्ट्यातील कांदा युरोप व दुबईत जाऊ लागला आहे.
भेंडी येथून कंटनेर भरला जातो. दुबईकरिता एका कंटनेरमध्ये ३० मेट्रिक टनप्रमाणे १० कंटनेरमधून ३०० मेट्रिक टन कांदा मुंबईमार्गे जहाजाने सात दिवसात दुबईत पोहचतो. दुबईप्रमाणे युरोपात ६० मेट्रिक टन कांदा निर्यात झाला आहे. कळवण व परिसरातील कांदा उत्पादकाना त्याचा फायदा झाला आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन कांद्याबरोबर टमाटा, मिरची यांची खरेदी करून परदेशात निर्यात केली जात असल्याची माहिती सद्गुरु एंटरप्राईजेसचे संचालक प्रशांत नारकर व गुरुकृपा एंटरप्राईजेसचे संचालक विश्वपाल मोरे यांनी दिली. कृषी व पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक जयेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत नारकर, प्रांजली नारकर, विश्वपाल मोरे, सीताराम बिष्णोई, संतोष भोसले, सांकेतिक जोरे निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून कसमादे पट्ट्यातील शेतकºयांना मार्गदर्शन करून फायदा करून देत आहे.मशीनमध्ये कांदा टाकून प्रतवारी कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी व कळवण बाजार समितीत महाराष्ट्र राज्य कृषी व पणन मंडळ यांच्या सहकार्यातून सद्गुरु एंटरप्राईजेस व गुरुकृपा एंटरप्राईजेस १२ ते १५ रु पये प्रमाणे कांद्याची खरेदी करून निर्यातकेंद्रात कांदा प्रत ग्रेडिंग मशीन असल्याने मशीनमध्ये कांदा टाकून त्याची प्रतवारी करण्यात येते. सुविधा केंद्रात ६५०० मेट्रिक टन कांद्याची खरेदी करून साठवणूक क्षमता करण्यात आली आहे, निर्यातीसाठी विशिष्ट पॅकिंग करून सद्गुरु एंटरप्राईजेस व गुरु कृपा एंटरप्राईजेस यांच्या माध्यमातून कांदा परदेशात निर्यात केला जात आहे.