पूर्व भागात कांदालागवड जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:20 AM2019-12-22T00:20:30+5:302019-12-22T00:20:47+5:30

नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे.

 Kandalagavad in the eastern part | पूर्व भागात कांदालागवड जोरात

पूर्व भागात कांदालागवड जोरात

Next

एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाची पिके पेरणीची लगबग मोठ्या प्रमाणात सुरू असून, त्यातही सध्या कांद्याला मिळालेला दर पाहता, शेतकऱ्यांचा कल कांदा लागवडीकडे अधिक आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून थंडी व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, बाभळेश्वर, मोहगाव, जुने सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, चांंदगिरी, हिंगणवेढे, गंगापाडळी, कालवी, लाखलगाव, पिंप्री, ओढा, शिलापूर, माडसांगवी, गंगावाडी या पंचक्रोशीत रब्बी पिकांची लागवड करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. उन्हाळ कांदा लागवड, गहू, हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी काही भागात झाली आहे, तर काही ठिकाणी अजूनही सुरू आहे. या भागातील शेतकरी गव्हाच्या पारंपरिक वाणांबरोबरच इतरही सुधारित वाणांना पेरणीसाठी पसंती देतात. मात्र गव्हाच्या बियाणांची कमतरता निर्माण झाल्याने त्यासाठी अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जात असल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. एकलहरे, कोटमगाव, हिंगणवेढे शिवारात अजूनही अवकाळी पावसामुळे बºयाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतात ओल आहे. एकलहरे राखेच्या बंधाºयातील पाण्यामुळेही शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे वावर तयार करताना अधिक मेहनत घ्यावी लागत आहे. तर काही ठिकाणी उशिरानेच पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, जाखोरी, हिंगणवेढे शिवारात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यासाठी वाफे पद्धती न वापरता मोठमोठे व लांबलचक बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळ्या पसरून कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. या रोपांची लागवड केली जात असली तरी, सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.
मात्र थंडी व धुक्यामुळे मावा, करपा, भुरी या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकºयांना महागडी औषधे फवारणी करावी लागत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागात काही ठिकाणी कांदापात गोल गुंडाळून कांदा पांढरा पडू लागला आहे. या हवामानाचा द्राक्षबागांनाही फटका बसू लागला असून, द्राक्ष मण्यांच्या फुगवणीवर विपरीत परिणाम होऊन मण्यांना तडे जाऊ लागले आहेत. सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याची स्थिती आहे. थंडीमुळे मण्यांना क्रॅँक जाऊन पाण्याचे प्रमाण कमी
होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हवामान बदलामुळे रोपे पिवळी पडली
तालुक्याच्या पूर्व भागात कांद्याची लागवड सुरू आहे. त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी टाकलेले रोप तयार झाले आहे. सध्याच्या बदललेल्या हवामानामुळे हे रोपही अनेक ठिकाणी पिवळसर पडू लागले आहे. परिसरात काही ठिकाणी यापूर्वीच काही शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे. हे कांदे आता बºयापैकी पात धरू लागले आहेत.

Web Title:  Kandalagavad in the eastern part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.