कांदाप्रश्नी शिवसेना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 12:22 AM2017-09-17T00:22:32+5:302017-09-17T00:23:13+5:30
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्र वारी लिलाव झाले नाहीत. मालेगावला सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणावगळता कोठेही लिलाव झाले नाहीत.
कळवण : नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, येवला, कळवण, चांदवडसह मोठ्या बाजार समित्यांमध्ये शुक्र वारी लिलाव झाले नाहीत. मालेगावला सुटी असल्यामुळे बाजार समिती बंद होती. मनमाड, सटाणावगळता कोठेही लिलाव झाले नाहीत. त्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापाºयांनी कांदा लिलाव सुरळीत सुरू करावेत, अन्यथा शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात जनआंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी दिला आहे.
आयकर व प्राप्तिकर विभागाकडून जिल्ह्यातील कांदा व्यापाºयांकडे धाडी टाकल्याच्या निषेधार्थ कांदा व्यापाºयांनी
बेमुदत कांदा खरेदी बंद केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असल्याने कांदा खरेदी पूर्ववत सुरू करावी या मागणीसाठी शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे व जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या शिष्टमंडळाबरोबर त्यांनी सकारात्मक चर्चा करून याप्रश्नी जिल्हा उपनिबंधकाशी जिल्हाधिकाºयांनी चर्चा करून शिवसेनेच्या मागण्याची दखल घेत कांदा लिलाव जिल्ह्यात सोमवारपासून सुरळीतपणे सुरू करण्याची सूचना केली. शिष्टमंडळात शिवसेनेचे कळवण नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साहेबराव पगार, कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शीतलकुमार अहिरे, माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, अभोणा विभागप्रमुख अंबादास जाधव, उपतालुकाप्रमुख राजू वाघ, बबलू पगार, स्वप्नील रौंदळ आदीसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.