कांदे यांचा प्रहार, भुजबळ यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2021 01:43 AM2021-10-01T01:43:58+5:302021-10-01T01:44:54+5:30

नियोजन विभागाच्या निधी पळवण्यावरून भुजबळांच्या विरोधात दंड थेापटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत अशी टीका त्यांनी केली आणि पालकमंत्री पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही यावेळी उपस्थित असल्याने सेनेने भूजबळांच्या विरोधात आघाघडी उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे पालकमंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा आरोपाचे खंडन करताना मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात योग्य तो निर्णय होईल असे सांगून आपल्या पुरता वादावर पडदा पडल्याचे सांगितले.

Kande's attack, Bhujbal's refusal | कांदे यांचा प्रहार, भुजबळ यांचा नकार

कांदे यांचा प्रहार, भुजबळ यांचा नकार

Next
ठळक मुद्देआरोप- प्रत्यारोपांचा ‘सामना’: हे तर भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य शेलकी टीका

नाशिक- नियोजन विभागाच्या निधी पळवण्यावरून भुजबळांच्या विरोधात दंड थेापटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत अशी टीका त्यांनी केली आणि पालकमंत्री पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही केली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही यावेळी उपस्थित असल्याने सेनेने भूजबळांच्या विरोधात आघाघडी उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे दुसरीकडे पालकमंत्री भुजबळ यांनी पुन्हा एकदा आरोपाचे खंडन करताना मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात योग्य तो निर्णय होईल असे सांगून आपल्या पुरता वादावर पडदा पडल्याचे सांगितले.

नांदगाव तालुक्याचे आमदार कांदे हे भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांना पराभूत करून निवडून आले असून गेल्या आठवड्यात पावसामुळे नुकसान भरपाईच्या वेळी निधीवरून पालकमंत्री छगन भुजबळ आणि कांदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. नंतर हा वाद नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मिटल्याचे सांगण्यात आले आणि त्यानंतर अचानक कांदे यांनी निधीच्या पळवापळवीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल हेाती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच ही याचिका दाखल केल्याने छोटा राजन टोळीकडून धमकवण्यात आल्याचा आरोप कांदे यांनी केला. बुधवारी (दि. २९) भुजबळ यांनी त्याला प्रत्युत्तर देताना मी भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नसल्याचा दावा केला होता. त्यावर पुन्हा कांदे यांनी गुरूवारी प्रत्युत्तर दिले आहे.

भुजबळ यांची दुसरी युनिव्हर्सिटी पैसे जमविण्याची आहे अन्यथा भाजीपाला विकून २५ हजार कोटींचे मालक होते येते का? असा सवालही त्यांनी केली. धमकावण्याचा भुजबळ यांचा पूर्व इतिहास असल्याचा आरोप करतानाच रिअल इस्टेट व्यावसायिक ललित टेकचंदानी यांनी २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या तक्रारीचा दाखलाही यावेळी कांदे यांनी दिला. दरम्यान, भुजबळ यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेताना आपल्या दृष्टीने वाद संपला असल्याचे सांगितले. निधी वाटपात राजी नाराजी झाली याचा अर्थ माध्यमांकडे जाणे किंवा उच्च न्यायालयात जाणे अयोग्य असल्याचे भुजबळ म्हणाले.

इन्फेा...

शिवसेना प्रमुखांच्याअटकेचा मुद्दा उकरला..

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा त्यांच्यावर दाखल असलेला गुन्हा मागे घेण्यासाठी अटी-शर्ती घालणाऱ्या व्यक्तीविरोधात शिवसेना कायम मैदानात राहणार असल्याचे सुहास कांदे यांनी स्पष्ट केले. शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा विषय मागे पडला. बाळासाहेब ठाकरे यांचाही राग गेला आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही राग नाही मग यांनाच राग का असा प्रश्न भुजबळ यांनी केला.

इन्फो...

बालक पालकांचा वाद

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी बालकांनी पालकांप्रमाणे आणि पालकांनी बालकांप्रमाणे वागू नये असा सल्ला दिला. त्यावर भुजबळ यांनीही बालकांनी नाराजी व्यक्त केली तर ती घरातच असावी चव्हाट्यावर वाद करू नये असे सांगितले.

कोट..

मी कोणाला धमकी देत नाही फार तर विनंती करतो. त्यामुळे याबाबत तथ्य नाही. हा भुजबळ विरुध्द सेना असा संघर्ष नाही. महाविकास आघाडीत असल्याने अशा प्रकारचे आरोप- प्रत्यारोप योग्य नाही.

- छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक

Web Title: Kande's attack, Bhujbal's refusal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.